1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (18:25 IST)

तरुणीला प्रपोज करणे महागात पडले, पाहा Viral Video

propose day 2023
जगभरात 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. जगभरातील प्रेमी जोडपे मोठ्या उत्साहात हा दिवस आणि व्हॅलेंटाईन वीक साजरा करतात. या वीकमध्ये प्रपोज डे देखील असतो. अशात प्रेम व्यक्त करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पण यात मुलीने मुलाचं प्रपोजल नाकरल्यामुळे तिथलं वातावरण बदलतं.
 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये क्लासरूममध्ये एका मुलाने मुलीला लाल गुलाब देऊन प्रपोज केल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यावर मुलगी त्याचा प्रस्ताव नाकारते. पण ही गोष्टी इथंच थांबत नाहीत तर रागाच्या भरात मुलगी मुलाकडून गुलाब हिसकावून फेकून देते. त्यानंतर परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचते. मुलीने नकार दिल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.