गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (18:13 IST)

गादीखाली आढळला विषारी साप

naag
सापाला पाहून काय त्याचे नाव जरी घेतले तरीही अंगाचा थरकाप उडतो. साप घरात शिरल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतातच. सापासोबत स्टंट करणे हे तरुण  वर्गासाठी जणू मनोरंजनाचे साधनच झाले आहे. सापा सोबत स्टंट करताना काहींचा अनेकदा जीव धोक्यात येतो तर  काहींना जीव गमवावा लागतो. सध्या सोशल मीडियावर घरात साप शिरून गादीखाली साप आढळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ केरळ मधला एका घराचा आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by kingstar (@__mallugram)

 या  व्हिडीओ मध्ये साप पलंगाच्या गादीखाली लपलेला असून तो गादी उचलल्यावर देखील पलंगाखाली शिरण्याचा प्रयत्न करत आहे. या सापाला पाहूनच अंगाचा थरकाप उडतो. पलंगाच्या जवळ खिडकी आहे आणि साप या खिडकीतून आत आल्याचे आढळून आले.

Edited By - Priya Dixit