मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 8 सप्टेंबर 2018 (00:01 IST)

अ‍ॅपल स्टोअरवरील 25 हजार अ‍ॅप्स हटविली

अ‍ॅपल स्टोअरवरील तब्बल 25 हजार गेमिंग अ‍ॅप्स चीनने बंद केली आहेत. इंटरनेट नियमांत (पॉलिसी) चीनकडून बदल करण्यात आल्याने ही अ‍ॅप्स बंद करण्यात आल्याचे अ‍ॅपलकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, चीनने सुरक्षेला अडथळा असल्याने मागील वर्षी अ‍ॅपल स्टोअरवरील 100 अ‍ॅप्स बंद केली होती.
 
आमच्याकडून बेकायदेशीर ठरवण्यात आलेली अ‍ॅप्स बंद करण्यात आली असून यानंतर या प्रकारची अ‍ॅप्स पुन्हा स्टोअरवर येणार नाहीत, कंपनीकडून याविषयीची काळजी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु अ‍ॅपलकडून पुरेसे प्रयत्न केले जात नसल्याचे स्थानिकांकडून आरोप केले जात आहेत. आपल्या स्टोअरवर अ‍ॅप्स पब्लिश करण्यासाठी अ‍ॅपलने नियम ठरवले आहेत. पण हे नियम अ‍ॅपलकडून पाळले जात नसल्याने ही बेकायदेशीर अ‍ॅप्स स्टोअरवर येतात, असे एका वृत्तसंस्थेकडून सांगण्यात आले आहे.
 
सध्या अमेरिका-चीनमध्ये व्यापारयुद्ध रंगले असून याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. याचा परिणाम नक्कीच जगाच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येणार आहे. अ‍ॅपलसारख्या मोठ्या कंपन्यांवर या वॉरचा परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. कारण चीनमध्ये अ‍ॅपलकडून मोठ्या प्रमाणात गुंणतवणूक करण्यात आली आहे. अ‍ॅपलकडून जुलै महिन्यामध्ये चीनमधील ऊर्जा प्रकल्पामध्ये 30 कोटी डॉलरची गुंणतवणूक करण्यात आली आहे. चीनमध्ये पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवण्याचा दृष्टीने 'चायना क्लीन एनर्जी' योजना सुरू करण्यात आली आहे. 1 गीगा वॉट पारंपरिक ऊर्जा या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे.