गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (19:38 IST)

पन्नास खोके एकदम ओके वर भाविकांचे भजन

सध्या राज्यात शिंदे सरकार आणि ठाकरे यांच्यात शिवसेना कोणाची यावरून युद्ध सुरु आहे. शिवसेनेतील 50 आमदारांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघडी सरकार कोसळली आणि शिवसेनेचे 40 आमदार गुवाहाटीच्या हॉटेलात जाऊन बसले. यंदाच्या पावसाळी अधिवेशनममध्ये ठाकरे गटाच्या आमदारांनी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी '50 खोके एकदम ओके' ओला दुष्काळ जाहीर करा, पूरग्रस्तांना मदत करा,याची घोषणा केली. आता त्या घोषणेवरून गणेशोत्सवात काही गणेश भाविकांनी चक्क भजन तयार केले आहे. या भजनांचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहे. 
सध्या 50 खोके एकदम ओके चे भजन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काय झाडी, काय डोंगूर, काय हाटील असं म्हणत काही गणेश भाविक भजन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.