शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 सप्टेंबर 2018 (00:16 IST)

चक्क शेतात सापडला हिरा!

मध्यप्रदेशातील पन्ना हे ठिकाण जुन्या काळापासूनच हिर्‍यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. पन्ना जिल्ह्यातील एकाशेतकर्‍याला आपल्या शेतात 12 कॅरेट 58 सेंटचा हिरा सापडला आहे. त्याची अंदाजे किंमत 30 लाख रुपये आहे. या हिर्‍याच्या लिलावानंतर आता हा गरीब शेतकरी लक्षाधीश बनेल. जिल्हा खनिज व हिरा अधिकारी संतोष सिंह यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, प्रकाश कुमार शर्मा नावाच्या शेतकर्‍याला सरकोहा गावातील आपल्या शेतात हा हिरा सापडला. त्याची खरी किंमत किती आहे हे लिलावानंतरच स्पष्ट होईल. या शेतकर्‌याने हा हिरा जिल्ह्याच्या हिरा कार्यालयात जमा  केला. आता या हिर्‍याला लिलावात ठेवण्यात येणार आहे. तिथे दर तीन महिन्यांनी हिर्‍यांचा लिलाव केला जातो. या हिर्‍याचा लिलाव झाल्यावर 12 टक्के रॉयल्टी आणि अन्य कर कापून जे पैसे येतील ते सर्व या शेतकर्‍याला मिळतील. विशेष म्हणजे ज्या शेतात हा हिरा सापडला ते शेत केदारनाथ रैकवार नावाच्या शेतकर्‌याचे असून प्रकाश कुमारने ते रितसर भाड्याने घेतलेले आहे!