सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (10:11 IST)

चार वर्षाच्या चिमुकलीने शोधले डायनोसॉरच्या पायांच्या ठशे

एका चार वर्षाच्या लहानश्या मुलीने समुद्राकिनारी डायनोसॉरच्या पायांच्या ठशे शोधले. वैज्ञानिकांच्या मते हे पायाचे ठसे सुमारे 220 मिलियन वर्ष जुने असू शकतात.
 
मीडियात आलेल्या वृत्तानुसार दक्षिण वेल्स येथे राहणारी लिली वाईल्डर ही बॅरी गावच्या समुद्रकिनाऱ्यावरून चालत असताना तिला डायनासोरच्या पायांचे ठसे दिसले. लिली तिच्या वडिलांबरोबर समुद्रावर गेली असताना तिनं ते आपल्या वडिलांना दाखवलं. लिलीची आई सॅली वाईल्डर यांनी सांगितले की तिला फोटो बघून आश्चर्य वाटले तेव्हा आम्ही याविषयातील तज्ज्ञांना लगेचच फोन केला. हे ठशे 220 मिलियन वर्ष जुने असू शकतात असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे तसेच या ठशांच्या माध्यमातून डायनोसॉर्स कसे चालायचे हे समजण्यास मदत होईल.
 
बेंड्रिक्स बे हा समुद्रकिनारा डायनोसॉरच्या पायांच्या ठशांसाठीच प्रसिद्ध आहे. वेल्स म्युजियमच्या नॅशनल म्युजियम ऑफ पीएऑनटोलॉजीचे क्युरेटर सिंडी हॉवेल्स यांच्या मते या बीचवर आढळून येणाऱ्या डायनासॉरच्या पायांच्या नमुन्यांपैकी हा सर्वात उत्तम नमुना आहे. या पायांच्या ठशांची लांबी केवळ 10 सेंटीमीटर आहे. हे जिवाश्म राष्ट्रीय संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलं असून हे वैज्ञानिकांना त्याच्या शोधकार्यासाठी मदतीचं ठरणार आहे.