1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 26 जुलै 2018 (08:41 IST)

पोलीस कार्यालयाचे नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

गडचिरोलीत जिल्हा पोलीस दल आणि आदर्श मित्रमंडळाने शांतीचा संदेश देत एकाचवेळी ६ हजार ७८६ नागरिकांच्या उपस्थितीत‘गांधी विचार व अहिंसा’ या पुस्तकाचे वाचन करीत गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये आपले नाव नोंदवले. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे १२८ नियम पार करून एसपी ऑफिसने हा विक्रम केला आहे. यापूर्वी तुर्कस्तानमध्ये ५ हजार ७५४ नागरिकांच्या उपस्थितीत ‘स्पिरिट ऑफ मून अ‍ॅण्ड स्टार’पुस्तकाचे वाचन करून विक्रम केला होता. त्याला मागे टाकत गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने विश्वाला शांतीचा संदेश दिला आहे. एखाद्या पोलीस मुख्यालयाचे नाव अशा पद्धतीने गिनेस बुकात नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
हा व्रिकम करताना पोलीस कवायत मैदानावर १२ सी.ए.ची ऑडिटिंग टीम, १३ ऑनलाइन कॅमेरे, एक ड्रोनची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थित सर्वाच्या हाताला एक बारकोड टॅग लावण्यात आला. जवळपास २० मिनिटापर्यंत पुस्तकाचे वाचन करून त्याचे सर्व दस्तऐवज ऑनलाइन गिनीज बुककडे पाठवण्यात आले.