शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (16:08 IST)

गडचिरोलीत सापडले डायनासोर, मासे व झाडांचे हजारो वर्षांपूर्वीचे अवशेष

गडचिरोली जिल्हय़ातील सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली गावात पुरातत्व संशोधकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणत डायनासोर, मासे व झाडांचे हजारो वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. यामध्ये जागतिक दर्जाच्या  अमेरिका , भारतातील जीवाश्म वैज्ञानिकांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. सोबत त्यावर अवशेषाचे संशोधन सुरू केले आहे. यामध्ये  विशेष असे की  २०१५ साली सुद्धा  डायनासोरचे अवशेष सापडलेले आहेत. राज्यातील तेलंगणा राज्यांच्या सीमेवरील गडचिरोली जिल्हय़ात गोदावरी आणि  इंद्रावती नदीच्या काठावर सिरोंचा तालुका वसलेला आहे.  तालुक्याच्या ठिकाणाहून २० किलो मीटरवर कोटापल्ली, चिट्टर व बोरगुडम येथे डायनासोरचे जीवाश्म असल्याची माहिती समोर आली आणि  उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी वैज्ञानिकांच्या टीमला येथे पाठवले होते. या टीम मध्ये  अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. जॉर्ज विल्सन, डॉ. जेफ विल्सन, भारतातील डॉ. धनंजय मोहबे, डॉ. डी. के. कापगते यांचा समावेश होता. सिरोंचा परिसरात डायनासोर, मासोळी, झाडे तसेच जीवाश्म सापडत असल्यामुळे येथे ‘फॉसिल पार्क’ तयार करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. डायनासोरचे अवशेष सापडल्यामुळे मुंबई, पुणे, बंगलोर,  येथून मोठय़ा संख्येने संशोधक  येथे येत आहेत. यामुळे या जागेला आता जागतिक महत्व प्राप्त झाले असून अनेक देशातून नागरिक या ठिकाणी भेट देत आहेत.