मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

पोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा केला. गडचिरोली पोलिसांच्या सी-60 या नक्षलविरोधी पथकाने इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई केली.  यात कमांडर साईनाथ आणि सिनू हर यांचाही समावेश आहे.
 
ताडगाव जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. या दरम्यान नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 16 नक्षलवाद्यांना ठार मारले. तीन तास चाललेल्या या चकमकीत 10 नक्षलवादी जखमी झाले आहेत. मात्र, या नक्षलवाद्यांना पळवून नेण्यात इतर साथीदारांना यश आले. नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत मोठे यश मिळाल्याबद्दल राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी सी-60 पथकाचे अभिनंदन केले आहे. नजीकच्या काळातील नक्षलवाद्यांविरोधातील ही सर्वात मोठी यशस्वी कारवाई आहे.