शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी विधानसभेतील राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांची निवड केली जाणार आहे. पुण्यात 29 एप्रिल रोजी होणार्‍या तालुकाध्यक्ष आणि प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीत याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
 
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्यासह ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील, आ. शशिकांत शिंदे उत्सुक होते. मात्र, खा. सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांच्या पारड्यात वजन टाकल्याने इच्छुकांचे पत्ते गळाल्याचे बोलले जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत दिल्लीत हालचाली सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
आ. जयंत पाटील यांनी गटनेते म्हणून विधानसभेत प्रभावी कामगिरी आहे. मुद्देसूद मांडणी आणि खास शैलीतून ते सत्ताधार्‍यांची बोलती बंद करतात. तसेच सांगली या आपल्या होमपीचवरही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवून पक्षाचे मजबूत स्थान निर्माण केले आहे.