शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 3 जुलै 2022 (17:40 IST)

हाय प्रोफाइल मद्यपी तरुणींचा भररस्त्यात धिंगाणा

भोपाळमधील होशंगाबाद रोडवर असलेल्या एका पबच्यासमोर बुधवारी रात्री उशिरा दोन मुलींमध्ये भांडण झाले. या घटनेत दोघांनी एकमेकांचे केस ओढले, शिवीगाळ, लाथा-बुक्क्या केल्या. दोघेही मित्रांसोबत मद्यपान करण्यासाठी आल्या होत्या.  हा संपूर्ण व्हिडिओ भोपाळच्या होशंगाबाद रोडवर असलेल्या एका पबसमोरचा आहे. पबमध्ये बॉयफ्रेंडवरून मुलींचे भांडण झाले होते. 
 
पहिल्या प्रियकरावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रस्त्याने येताना दोघांमध्ये भांडण झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.
 
मिसरोड पोलीस प्रकरणाची माहिती मिळताच दाखल झाले आणि त्यांनी रात्री उशिरा सर्व तरुणी व त्यांच्यासोबत असलेल्या युवकांना पोलीस ठाण्यात आणले. सर्वांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. पोलिस ठाण्यात गेल्यावर त्यांचा नशा कमी झाला आणि त्यांनी  पोलिसांची माफी मागायला सुरुवात केली. दोन्ही पक्षांना समजविल्यावर सर्वांना सोडून देण्यात आले.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होशंगाबाद रोडवरील एका मॉलमध्ये पब आहे. रात्री उशिरा मॉलबाहेर मुलींमध्ये भांडण झाल्याची बातमी आली. घटनास्थळी पोहोचल्यावर चार ते पाच मुली आपापसात भांडताना दिसल्या. त्यांच्या सोबत काही मुलं होती. सर्वांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. एक मुलगी गांधीनगरची, एक तीला जमालपुरा आणि इतर दोन शाहपुरा येथील रहिवासी आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पबमध्ये मुली दारू पिण्यासाठी येतात. दारू पिऊन येथे अनेकदा मारामारी होत असते. कधीकधी परिस्थिती हाणामारीत होते. मद्यपान करून इथे नेहमी भांडण वादावादी हाणामारी होत असते. नंतर एकमेकांची माफी मागून तडजोड करतात. गोंधळ घालणाऱ्या मुलींच्या कुटुंबीयांनाही पोलिसांनी माहिती दिली आहे.