मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (14:11 IST)

ऐतिहासिक महत्व . धार्मिक महत्व असलेला नाशिकमधील शेकडो वर्ष परंपरेचा श्री राम रथ पूर्ण महती व त्याची माहिती व इतिहास

प्रभू श्रीराम व गरुड रथोत्सवाला २५० वर्षांची परंपरा
नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळख असलेल्या प्रभू श्रीराम व गरुड रथोत्सवाला २४६ वर्षांची परंपरा आहे. सवाई माधवराव पेशवे एकदा आजारी पडल्याने त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला नवस केला. बरे वाटल्यानंतर पेशवे यांनी प्रभू रामाला रामरथ अर्पण केला. या रथाच्या देखभालीची जबाबदारी पेशवे यांनी त्यांचे मामा सरदार रास्ते यांच्याकडे सोपविली.
 
माधवराव पेशवे एकदा आजारी पडल्याने
नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळख असलेल्या प्रभू श्रीराम व गरुड रथोत्सवाला २४६ वर्षांची परंपरा आहे. सवाई माधवराव पेशवे एकदा आजारी पडल्याने त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला नवस केला. बरे वाटल्यानंतर पेशवे यांनी प्रभू रामाला रामरथ अर्पण केला. या रथाच्या देखभालीची जबाबदारी पेशवे यांनी त्यांचे मामा सरदार रास्ते यांच्याकडेसोपविली.
 
आखाडा तालीम संघाची स्थापना
रास्ते यांनी त्यावेळी तरुण मंडळी एकत्र यावी यासाठी रास्ते आखाडा तालीम संघाची स्थापना करत व्यायामप्रेमी व पहिलवान घडविले आणि नंतर हेच पहिलवान पुढे रथोत्सवात रथ ओढण्याचे काम करू लागल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली आणि तेव्हापासून आजता गायत सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडे श्रीराम रथाची जबाबदारी आहे. पूर्वीच्या काळी रस्ते नसल्याने खडतर मार्गानेच रथ ओढला जायचा. एकदा रथोत्सवाच्या दिवशी रथ वाघाडी नाल्यातील चिखलात फसला. त्यावेळी पाथरवट समाजाच्या काही युवा कार्यकर्त्यांनी चिखलात रूतलेला रथ सुखरूपपणे बाहेर काढल्याने तेव्हापासून रामाच्या रथाची धुरा वाहण्याचा मान समस्त पाथरवट समाजाकडे दिला आहे.
 
श्रीराम रथाचे मानकरी हे सरदार रास्ते आखाडा तालीम संघाचे पदाधिकारी आहेत तर गरुड रथाचा मान अहल्याराम व्यायाम शाळेकडे आहे. रथोत्सवाचे मुख्य मानकरी हे बुवा असतात. यंदा पुष्करराजबुवा हे मानकरी असून, बुवा रथोत्सवाच्या मानकऱ्यांना मानाचा गंध लावून सत्कार करतात. श्रीरामाचा रथ हा पूर्णपणे सागवानी लाकडापासून तयार केलेला आहे. पंधरवड्यापूर्वी श्रीरामाच्या रथाचे उजवे चाक बदलण्यात आले. सांगली येथील कारागिराने हे चाक बनविले तर पाथरवट समाजाच्या एका भाविकाने पुढाकार घेत रथाच्या चाकासाठी आलेल्या ७० हजार रुपये खर्चाची जबाबदारी पेलली. १७७२ पासून रथोत्सवाची परंपरा असून दरवर्षी श्रीरामन वमीनंतर  दोन दिवसांनी येणाºया कामदा एकादशीला हा रथोत्सव साजरा केला जातो. काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून निघणाºया या रथोत्सव यात्रेत तमाम नाशिककर मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.

बुवांचे रथाभिमुख दिशेने मार्गक्रमण
रथोत्सवाच्या दिवशी रथाचे मानकरी असलेले बुवा हे दोन्ही रथांकडे तोंड करून उलट्या दिशेने रथोत्सव मार्गावर मार्गक्रमण करत असतात. दरवर्षी पुजारी कुटुंबीयातील सदस्यांना हा मान मिळत असतो. रथोत्सवाच्या आदल्या दिवशी मालविय चौकातून रथ राममंदिराकडे नेला जातो. पाथरवट समाजाच्या वतीने रथोत्सवाचे स्वागत म्हणून शिवाजी चौक, पाथरवट लेन, गजानन चौक परिसरात आकर्षक कमान उभारून तसेच विद्युत रोषणाई करून गुढ्या उभारून आदल्या दिवशी रथयात्रेचे जल्लोषात स्वागत केले जाते. रथोत्स वापूर्वी श्रीराम व गरुड रथांना रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाईचे काम केले जाते. श्रीराम रथापुढे गरुड रथ आकाराने लहान आहे. रथोत्सवाची तयारी पूर्ण झाल्यानंतर आदल्या दिवशी रथांची चाके, धुरी, तसेच ब्रेक तपासणी करून चाकांना वंगण लावण्याचे काम केले जाते.
 
रथ यात्रेस प्रारंभ
रथ यात्रेस प्रारंभ करण्यापूर्वी मानक–यांचा ढोल नगारा झांज यांचे गजरात मानक–यांना प्रभुचा प्रसाद म्हणून सालकरी बुवान कडून हार घालण्यात येतो व श्री फळ देऊन सत्कार केला जातो. मानकरी म्हणजे श्री अहील्याराम तालीम संघाचे पदाधिकारी श्री रास्ते आखाडाचे पदाधिकारी श्री काळाराम संस्थानचे संन्मानिय अध्यक्ष विश्वस्त तसेच वंश परंपरागत सेवाकरणारे सेवेकरी उत्सवात व इतरवेळीही सेवा केणारे भाविक यांचा हार घालून व श्रीफळ देउन सत्कार करण्यात येतो. त्यानंतर सालकरी बुवांच्या सस्ते राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय महारूद्र हनुमान की जय असा जयघोष करून श्रीफळ वाढविण्यात येते बुवांना जरीचे पांढरे शुभ्र उपरणे फेट्यासारखे डोक्यावर बांधले जाते. हेतू हा की रथयात्रेत बुवांचे उन्हापासून संवरक्षण व्हावे संरक्षण व्हावे व तसेच सालकरी बुवा म्हणून लवकर ओळख पटावि सालकरी बुवांच्या हातात श्री प्रभुरामचंद्राच्या पादूका व श्रीराम लक्ष्मण व सीता यांच्या भोगमुर्ती प्रभावळी ठेवल्या जातात. श्रीराम प्रभुंच्या भोग मुर्तीला छत्र यामदोन अलंकृत केले जाते व प्रभुंवर चांदीच्या चौरीने वारा घातला जातो. सर्वच उपस्थित भाविक प्रभुंच्या पादूकांचे दर्शन घेतात. प्रभुंचे दर्शन घेतात.रूतवात पावन होतात, कृतकृत्य होतात. आनंदित होतात प्रभुच्या पादूकांना व मूर्तीना हात लाऊन दर्शन घेण्याची सगळ्यांनाच मुभा असते कोणत्याही तर्‍हेचा कसलाही भेदभाव तेथे नाही. प्रत्येक जन पादुकांना स्पर्श करू शकतो व दर्शन करू शकतो. श्रीराम प्रभुंच्या पादुका व भोगमूर्ती घेउन सालकरी बुवा मंदिराभोवती एक प्रदक्षीणा मारतात. व पुर्वेस घंटेखालील बाजुस. चांदीची पाखी ठेवलेली आसते तेथे येतात प्रदक्षणा करून असंख्य भाविक दर्शनाचा लाभ घेतात. पालखीत विधिवत पूजा आरती करून श्रीराम प्रभुंच्या पादुका व भोगमुर्ती ठेवण्यात येतात व ख–या अर्थाने रथयात्रेस प्रारंभ होतो. येथून सालकरीबुवा प्रभुंना पाठ दाकवायची नही या भावनेने प्रभुनकडे तोंड करूनच चालतात म्हणजे पालखीकडे तोंड करून चालतात, उलटे चालतात जाणकार भाविक बुवांना उलटे चालतांना योग्य ते मार्गदर्शन करतात सालकरी मंदिराच्या पूर्वेस पूर्वे दरवाज्या बाहेर येतात तेथे गरूड रथ तयार असतो. श्री गरूड रथ व श्रीराम रथ उत्तम त-हेने सजवलेले असतात. त्यांची योग्य ती देखभाल केलेली आसते. ऑइलींग ग्रेसिंग केलेली असते तसेच ब्रेक सिस्टीम उत्तम तर्‍हेने काम करत असल्याचे तपासलेले आसते रथांना उत्तम तर्‍हेने रंगरंगोटी केलेली आसते. केळीचे खांब रथाची शोभा वाढवित असतात. रोषनाईसाठी दिव्यांच्या माळा हॅलोजन बल्ब यांचा उत्तम त-हेने वापर केलेला आसतो. तसेच ध्वनी क्षपणाची व्यवस्थाही उत्तम केलेली आसते. साळकरी बुवा रथाजवळ उलटे चालत पालखीकडे श्रीराम प्रभुनकडे तोंड करून येतात व रथारूढ होतात. श्रींची पालखीपण रथाच्या उंचीला मिळवून श्री सालकरी बुवांच्या हस्ते पूजा पुजा आरती उपचार होतात व श्रीराम प्रभुंच्या पादूका व भोगमुर्ती पालखीतून गरूड रथात ठेवल्या जातात तेथे पुजा आरती होते. श्री गरूड रथानवर सालकरी बुवांच्या हस्ते हार घालून श्रीफळ देउन सत्कार केण्यात येतो त्यानंतर श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळाचे मानकरी व धुरीचे मानकरी यांच्या हस्ते धुरीवर श्रीफळ वाढवुन रथ यात्रेस प्रारंभ होतो. धरी म्हणजे रथाच्या पुढील बाजुस जो लाकडी दंडा असतो ज्याला रथाचे नाडे गुंडाळलेले असतात व ज्यामुळे रथ वाळविता येतो त्या लाकडी दांड्यास धुरी म्हणता. फटाक्यांची आतिषबाजि होते. व राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय महारूद्र हनुमान की जय जय सिता राम सिता या गजरात रथ पुढील बाजुस बाधलेल्या दोरखंडाने ( त्याला नाडा म्हणतात ) श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळाच्या कर्यकर्त्यांन कडून व भाविकांनकडून ओढावयास सुरूवात होते. श्री गरूड रथ हा श्रीराम रथाजवळ बाजुस थांबविला जातो साळकरी बुवांच्या हास्ते पुजा आरती होउन जयसीता रामसीता च्या गजरात श्री राम प्रभुंच्या भोगमुर्ती पालखीत ठेवल्या जातात.पालखीत मुर्ती ठेवल्यानंतर आरती केलीजाते व पालखी बाजुस घेतली जाते सालकरी बुवा गरूड रथातून उतरून श्रीराम रथावर आरूढ होतात. श्रीची पालखी श्रीराम रथाजवळ घेतली जाते पूजा करून श्रीराम प्रभुच्या मुर्ती रथात ठेवल्या जातात पूजा आरती होउन सालकरी बुवा श्रीराम रथातून खाली उतरतात उलटे श्रीराम प्रभुनकडे तोंड करून चालावयास सुरूवात करतात आता ही घरी रथयात्रेची सुरूवात होते. श्रीराम प्रभुनकडे तोंड करून उलटे चालनारे सालकरी बुवा त्याच्या मागोमाग श्रीची पालखी त्याच्या पाठीमागे श्रीराम प्रभुच्या मुर्ती आसलेला श्री गरूड रथ व त्यानंतर श्रीराम रथ अशी भव्य रथयात्रा होते. जयसीता रामसीता या नामाचा सारखा जय घोष सुरू असतो या रथयात्रेबरोबरच ढोल नगारा पथक , बॅंन्ड पथक, लेजीम पथक याचाही समावेश असतो.
 
अशी ही भव्य रथयात्रा श्रीराम मंदिराचे पूर्वव्दारा पासून सुरू होते. रथयात्रा गणेश वाडीतून वाळवंटात येते गाडगेमहाराज पुलाच्या खाली येते श्रीराम रथ व सालकरी बुवा तेथेच थांबतात सालकरी बुवा व्रतस्थ आसतात त्यांना नदि ओलांडायची नसते श्री गरूड रथ नदी ओलांडून श्री रोकडोबा मंदिराजवळ जातो.तेथे पुजा आरती होउन गाडगे महाराज पुलाखालून डावीकडे वळतो व सरळ नेहरू चौक , दहिपुल, चांदवडकर लेन या मार्गाने वळून मेनरोडला येतो. मेनरोडहून बोहोरपट्टी , दरकारवाडा भांडीबजार या मार्गे बालाजी मंदिरा पर्येंत येतो. तेथे आरती होते. कल्पना अशी आहे श्री हनुमान रामासाठी बालाजीची आरती आणतो तशीच कल्पना आशी श्री गरूडरथ पुढे असतो व त्यात श्री हनुमान व श्रीराम प्रभुच्या पादूका असतात. तर श्री हनुमान समस्त भाविकजनांना गावात जाऊन सांगतो की चला चला भाविकजन हो चला श्रीराम प्रभु रथारूड होउन येत आहेत चला दर्शनाला चला बालाजी मंदिरापासून श्री गरूड रथ कपूरथका पटांगनात येतो व थांबतो येथे सर्वच जन विश्रांती घेतात जलपान करतात येथेच बालाजी कोटावर श्री गायधनी परिवारातर्फे पूर्वापार परंपरागत सर्व श्री गरूड रथ ओढणा–या भाविकांना जलपाण दिले जाते श्रमपरिहार केला जतो. आजही ही परंपरा त्यांचे वंशज श्री विश्र्वनाथ ऊर्फ ( बाळासाहेब ) गायधनी आणि बंधू परिवार निष्ठेने पाळीत आहेत. जलपानाच्या विश्रांतीनंतर रथयात्रा गाडगे महाराज पुलाखालील खंडव्यावरून नदी ओलांडून पंचवटी परिसरात येते. तोपर्यंत श्री सालकरी बुवा व श्रीराम रथ येथेच असतात. भाविक प्रचंड संख्येने दर्शनास येत असतात हजारोच्या संख्येने भाविक म्हसोबा पटांगनात गाडगे महाराज पूल रामसेतूपूल नदीचे दोन्ही काठचा परिसर येथे प्रचंड प्रमाणात उपस्थित राहून श्रीराम प्रभुच्या दर्शनाचा लाभ घेतात. नाशिक शहरामध्ये जास्तित जास्त गर्दीचा उत्साहाचा हा दिवस आसतो ढोल नगारे झांजाच्या गजरात जयसीता रामसीता जय घोष सुरूच असतो. प्रत्येकजन उत्सहाने न्हावुन निघालेला आसतो राममय झालेला आसतो फटाक्यांची आतिषबाजी होते अशी ही रथ यात्रा श्रीची पालखी , सालकरी बुवा , श्री गरूड रथ , श्रीराम रथ अशी श्री रामकुंडावर येते रथातून श्री च्या पादुका व भोगमूर्ती विधिवत पुजा करून पालखित ठेवल्या जातात व वाजत गाजत रामकुंडावर ठेवतात तोपर्यंत रात्रीचे ९ वाजलेले असतात रामकुंडावर कोडशोपचार पूजा अभिषेक होतो व अदभुत स्नान होते येथे विशेष की प्रत्येक भाविकस पादुका व मुर्तीला पाणि वाहता येते स्नान घालता येते कोणत्याही त-हेचा मतभेद तेथे नाही स्पृश्य अस्पृश्य लहान मोठा स्त्री पुरूष कोणीही श्रीची पादुका व भोगमूर्तीस रामकुंडातील पवोत्र जलाने स्नान घालू शकतो त्यासाठी पुजाधिकारी पुजारी परिवारातील तरूण मंडळी पादुका व मुर्ती घेउन रामकुंडाचे काठा काठाने प्रदक्षिणा मारतात जेणेकरून उपस्थित असलेला प्रत्येक भाविक लाभ घेऊ शकेल अदभुत स्नानानंतर मूर्तीस पोषाख चढवून अतिशय ऊत्साहाने आरती होते व परत पादुका श्री गरूड रथात , मूर्ती श्रीराम रथात , पालखी पुढे त्या मागे उलटे चानणारे सालकरी बुवा. त्यामागे गरूड रथ व श्रीराम रथ अशी रथयात्रा रामकुंडावरून पाताळेश्र्वर मंदिराकडे धर्मशाळेवरून शनिचौकातून पुणे विद्यार्थी गृहावरून मंदिराच्या पूर्व द्वारास येते. विधिवत पूजा आरती होउन पादुका व मुर्ती श्री चे पालखीत ठेवल्या जातात. पूर्व दरवाजास पुजारी परिवारातील सुहासिनीनकडून व भाविक स्त्रि वर्गाकडून प्रभुस अवक्षण केले जाते पालखी व हनुमानाची मुर्ती विधिवत पुजा आरती करून मंदिरात आणली जाते तेथे आरती होते. सर्वांना पिठीसाखर प्रसाद दिला जातो मंदिरात फटाक्यांची आतिषबाजि केली जाते व नंतर रोज आरती होउन मंदिर साधारण रात्रौ १:३०-2 चे सुमारास बंद होते असा हा रथ यात्रेचा आनंद उत्सवाचा सोहळा संपन्न होतो.
 
 सर्व छायाचित्र : श्री काळाराम मंदिर संस्थान  नाशिक 
 
Edited By - Ratnadeep ranshoor