बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2023 (15:22 IST)

सांगलीची लेक ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी' कोण आहेत त्या जाणून घ्या !

सांगली येथे पार पडलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजयाचा मान प्रतीक्षा बागडी हिला मिळाला आहे. कल्याणच्या वैष्णवी पाटील हिला अस्मान दाखवून प्रतीक्षाने चांदीची गदा उंचावली. खरं तर महाराष्ट्र केसरीची मानकरी ठरलेली प्रतीक्षा ही एका पोलीस हवालदाराची मुलगी आहे.

पुरूष महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या धर्तीवर यंदा प्रथमच महिला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आयोजित करण्यात आली. पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सांगलीत ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित या स्पर्धेच्या विजयाचा मान सांगलीच्या लेकीने पटकावला.

दोघी मैत्रिणी लढल्या :
23 आणि 24 मार्च या दोन दिवशी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची अंतिम लढत सांगलीची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील यांच्यात पार पडली. एकेकाळी एकाच रूममध्ये राहणाऱ्या दोन पैलवानांमध्ये अंतिम सामना झाला. दोन मैत्रिणींमधील लढत पाहण्यासाठी कुस्ती चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. अखेर सांगलीच्या प्रतीक्षाने 'प्रतीक्षा' संपवत कल्याणच्या वैष्णवी पाटीलला अस्मान दाखवून महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला.
 
प्रतीक्षा बागडीनं रचला इतिहास
पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचा मान पटकावणारी प्रतीक्षा बागडी ही मूळची सांगलीच्या तुंग गावची आहे. प्रतीक्षा ही 21 वर्षांची असून ती वसंत कुस्ती केंद्र सांगली इथे सराव करते. लक्षणीय बाब म्हणजे राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने पदके पटकावली आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणाऱ्या प्रतीक्षाने खेलो इंडियामध्ये रौप्य पदक जिंकले होते. याशिवाय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ गटात देखील रौप्य पदक जिंकले होते.
 
प्रतीक्षा बागडीने महाराष्ट्र केसरीचा खिताब जिंकल्यानंतर सर्वस्तरातून तिचे कौतुक होत आहे. गुरुवारपासून (२३ मार्च) ही स्पर्धा सांगलीच्या मिरजेत रंगली होती. हिंदकेसरी दिनानाथ सिंग यांच्या हस्ते कुस्तीच्या या शानदार स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते.
 
पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी आहे तरी कोण?
पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी ही मुळची सांगली जिल्ह्याची आहे. ती या जिल्ह्यातील तुंग गावची रहिवासी आहे. विशेष म्हणजे प्रतीक्षा अवघ्या २१ वर्षांची आहे. तिने याआधी कुस्तीच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येदेखील पदके जिंकली आहेत. खेलो इंडिया स्पर्धेत प्रतीक्षाने रौप्यपदक जिंकले होते. सोबतच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रतिक्षा बागडीने रौप्य पदकाची कमाई केली होती.पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचा मान पटकावणारी प्रतीक्षा बागडी ही मूळची सांगलीच्या तुंग गावची आहे. प्रतीक्षा ही 21 वर्षांची असून ती वसंत कुस्ती केंद्र सांगली इथे सराव करते. लक्षणीय बाब म्हणजे राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने पदके पटकावली आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणाऱ्या प्रतीक्षाने खेलो इंडियामध्ये रौप्य पदक जिंकले होते. याशिवाय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ गटात देखील रौप्य पदक जिंकले होते.
 
महाराष्ट्री केसरीची फायनल चुरशीची झाली
प्रतीक्षा आणि वैष्णवी यांच्यात रंगलेली महाराष्ट्र केसरीची फायनलची लढत अत्यंत चुरशीची झाली. सुरुवातीला वैष्णवी पाटीलने सगल 4गुण घेत आघाडी मिळवली होती. मात्र, पुढच्याच डावात प्रतीक्षा बागडीने वैष्णवीला चितपट करत सामना जिंकला.
 
 
Edited By-Ratnadeep Ranshoor