शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 22 मार्च 2023 (15:05 IST)

चंद्रा गाण्यावर चिमुकलीचा डान्स

चंद्रमुखी या चित्रपटातील चंद्रा गाणं हे खूप गाजले आहे. या गाण्यानं सर्वांना भुरळ घातली आहे. महिला आणि तरुण तरुणी लहान मुले देखील या गाण्यासाठी वेडे झाले आहे. कोल्हापुरातील जिल्हापरिषदच्या शाळेतील एका चिमुकलीने चंद्रा गाण्यावर डान्स केला आहे. हर्षदा कांबळे असे या चिमुकलीचे नाव असून तिने चंद्रा गाण्यावर डान्स केला ती डान्स करत असताना तिचे हावभाव पाहून शाळेतील शिक्षकांनी तिच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला . सोशल मीडियावर तिच्या डान्सला अनेकांनी तिचे कौतुक केलं असून तिच्या डान्सचा व्हिडीओ पाहून स्वतः अभिनेत्री अमृता खानविलकरने व्हिडीओ शेअर करत हर्षदाचे कौतुक केलं आहे. तिने व्हिडीओ शेअर करत त्यावर 'चिमुकली चंद्रा' असे  कॅप्शन दिले आहे. 
 हर्षदा कोल्हापुरातील शाहूवाडीला अनुस्कुरा भागातील एका झेडपीच्या शाळेत शिकत असून तिला नृत्याची आवड आहे. असून तिच्या व्हिडिओ ला अनेकांनी लाईक्स केले आहे.     
 
Edited By - Priya Dixit