गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (16:13 IST)

उत्साहीपणाच्या निकषामध्ये भारत ११७व्या स्थानावर

India is ranked 117
जगातील सगळ्यात जास्त उत्साही व कार्यक्षम आहे आणि कुठला देश आळशी आहे याची वर्गवारी करण्यात आली आहे. यात जागतिक आरोग्य संघटनेनं १६८ देशांमध्ये पाहणी केली आहे. यात सगळ्यात जास्त शारीरिक कष्ट करणारा किंवा कामसू या निकषावर युगांडा या देशानं पहिलं स्थान मिळवलं आहे तर या यादीत तळाला म्हणजे सगळ्यात आळशी या स्थानावर कुवेत हा देश विराजमान झाला आहे.
 
या निकषामध्ये अमेरिका १४३व्या स्थानावर, इंग्लंड १२३व्या, सिंगापूर १२६व्या तर ऑस्ट्रेलिया ९७व्या स्थानावर आहे. कुवेत, अमेरिकन समोआ, सौदी अरेबिया व इराकमधल्या अर्ध्यापेक्षा जास्त जनतेला पुरेसा व्यायाम घडत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं नमूद केलं आहे. 
 
उत्साहीपणाच्या निकषामध्ये १६८ देशांमध्ये भारत ११७व्या स्थानावर असून फिलिपाइन्स १४१व्या तर ब्राझिल १६४व्या स्थानी आहे. दर आठवड्याला शरीराला ७५ मिनिटांचा तीव्र किंवा १५० मिनिटांचा मध्यम स्वरूपाचा व्यायाम घडत असेल तर तो पुरेसा व्यायाम शरीरासाठी आहे असा संघटनेचा निकष आहे.