बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (08:47 IST)

येत्या १ सप्टेंबरपासून पोस्टल पेमेंट बँक सुरु

टपाल विभागाची पोस्टल पेमेंट बँक १ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये या बँकेचा प्रारंभ एका क्लिकने करतील व त्याचवेळी देशातील ६५० जिल्ह्यांत पेमेंट बँक सुरू होईल. 
 
यात आधार क्रमांकाने तिच्यात खाते सुरू करता येईल. कागदाचा वापर शून्य असेल. पोस्टल पेमेंट बँक पैसे घरी नेऊन देणारी पहिलीच बँकदेखील बनेल. यासाठी देशातील ४० हजार नियमित व २.४० लाख ग्रामीण टपालसेवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. हे पोस्टमन चालती-फिरती बँक बनतील ते घरी जाऊन हँडहेल्ड मशीनच्या मदतीने खाते सुरू करतील, पैसे जमा करतील व रोख पैसेही देतील. यासाठी नाममात्र कमिशन ते घेतील. टपाल विभागाचे १७ कोटी बचत खातेधारक असून त्यांनाही या बँकेशी जोडण्यात येणार आहे.