गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 23 मे 2022 (12:43 IST)

अजय देवगणच्या चित्रपटाचा हा स्टंट करणं पडलं महागात

सोशल मीडियावर व्हायरल होणारे प्रत्येक व्हिडीओ आवडणारे असतील असे काही नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अजय देवगण च्या चित्रपटातील स्टंट करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. हा स्टंट त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये असणारा व्यक्ती चित्रपट अभिनेता अजय देवगण च्या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेल्या दोन चालत्या एसयूव्ही वाहनांवर  उभा आहे. आणि या स्टंट चा व्हिडीओ बनवत आहे. व्हिडीओ बनवल्यावर त्याला सोशल मीडियावर व्हायरल करणे त्याला महागात पडले आहे. त्याच्या हा व्हिडीओ पाहून नोएडा पोलिसांनी दखल घेत त्या स्टंट  करणाऱ्याच्या विरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीचे नाव राजीव असून तो 21 वर्षाचा आहे. त्याला नोकरी नाही आणि तो आर्थिक दृष्टीने संपन्न आहे. त्याच्या व्हिडीओ बावरून पोलिसांनी त्याच्या शोध घेऊन त्याला अटक केली आहे. तसेच त्यांनी व्हिडिओमध्ये वापरण्यात घेतलेल्या वाहनांना देखील जप्त केले आहे.