सोमवार, 26 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified शनिवार, 21 मे 2022 (16:29 IST)

'जगातील सर्वात महागडी कार', 1105 कोटी रुपये देऊनही मालकाला गाडी चालवण्याची परवानगी नाही

लक्झरी कार कंपन्यांपैकी एक असलेल्या मर्सिडीजच्या कार या महागड्या असल्या तरी आता तिची एक कार जगातील सर्वात महागडी कार बनली आहे. 1955 मध्ये बनवलेली मर्सिडीज-बेंझ 300 एसएलआर कार 1105 कोटी रुपयांना विकली गेली आहे आणि यासह ती जगातील सर्वात महागडी कार बनली आहे.
 
यापूर्वी ही सर्वात महागडी कार होती
या मर्सिडीज कारने 1962 च्या फेरारी-जीटीओलाही मागे टाकले. फेरारी जीटीओची 2018 मध्ये सुमारे 375 कोटी रुपयांना विक्री झाली.
 
खरेदीदाराचे नाव गुप्त
जर्मनीमध्ये झालेल्या एका गुप्त लिलावाद्वारे या कारची विक्री करण्यात आली आहे. विक्रीनंतर जगातील सर्वात महागडी विंटेज मर्सिडीज कार खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.
 
गंमत म्हणजे लिलावात कारसाठी एवढी मोठी रक्कम भरूनही ती गाडी मालकाला घरी नेणे शक्य होणार नाही आणि रोज रस्त्यावरून प्रवासही करता येणार नाही. नवीन मालकाला ही कार अधूनमधून ड्रायव्हिंगसाठी मिळेल. करारानुसार ही कार जर्मनीतील स्टटगार्ट येथील मर्सिडीज म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे.
 
Mercedes 300 SLR Uhlenhout coupe कार आठ-सिलेंडर मर्सिडीज-बेंझ W196 फॉर्म्युला वन कारच्या डिझाइनवर आधारित आहे. यासह अर्जेंटिनाचा स्टार कार रेसर जॉन मॅन्युएलने 1954-55 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती.