गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 18 मे 2022 (14:06 IST)

'नाच रे मोरा 'फेम तरूणाचे लग्न,स्वतःच्या लग्नात देखील धरला ठेका

कोणाचे ही लग्न असो वरातीत सर्व नाचण्याचा आनंद घेतात.लग्न जवळच्या मित्राचे असो, भाऊ बहिणीचे असो. नाचण्याचा मोह कोणालाही आवरता येत नाही.वर्षभरापूर्वी नाच रे मोरा या गाण्यावर ठेका धरत नाचताना पुण्यातील एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन गाजला होता. आता त्या तरुणाचे लग्न झाले असून तो स्वतःचा लग्नात देखील या गाण्यावर ठेका धरून नाचला आहे. त्याच्या नवरदेवाच्या वेषात  असलेला नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला युजर्सने पसंती दिली असून त्याला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.