गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 7 मे 2022 (12:13 IST)

नाग फणा काढून शिवलिंगावर बसल्याचा Video Viral

snake on shivlinga
प्रत्येक शिव मंदिरात शिवलिंगाला वेटोळे घालून बसलेल्या नागाची प्रतिकृती आपण बघितली असेल पण हाच नाग प्रत्यक्षात शिवलिंगाला वेटोळे घालून बसल्याचे दिसले तर कोणीही हैराण होणे साहजिक आहे.
 
जुन्नर येथील एका शंकराच्या मंदिरात असाच एक नाग फणा काढून शिवलिंगावर बसून असल्याचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. हा नाग सरपटत मंदिरात शिरला आणि हळूहळू शिवलिंगावर चढला.
 
शिवलिंगावर बसून त्याने फणा काढत इकडे तिकडे करू लागला जणू तो नृत्यचं करत आहे. त्याच्या या लिलेत कुणी तरी बाधा आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने फुस्स्स्स करत तो डाव उधळून लावला. भाविकांनी मंदिरात घंटानाद करून शंकराची पूजा करण्यास सुरुवात केली असत तो शांतपणे तसाच वेटोळे घालून बसला. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.