शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 4 मे 2022 (16:36 IST)

34 इंची वधू आणि 36 इंची वराचे लग्न पाहण्यासाठी लोकांची गर्दी

असं म्हणतात की लग्नगाठ वरूनच जुळून येते हे खरं आहे.आज पर्यंत आपण अनेक विवाहसोहळे पाहिले असतील आणि त्यात सहभागी झालेच असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका अनोख्या लग्नाबद्दल सांगत आहोत, ज्याच्या वधू-वरांची सर्वत्र चर्चा होत असून या विवाह सोहळ्याला पाहुण्यांची गर्दी झाली आहे. काही तर त्यात आमंत्रित देखील केलेले नाही असे पाहुणे होते.त्यांनी वधू-वरांसोबत सेल्फी काढली.
 
भागलपूर नवगचिया परिसरातील अभिया गावात हा विवाह सोहळा पार पडला.या लग्नात वराचे वय 36 इंच तर वधूचे वय 34 इंच होते.विवाह सोहळ्यात न बोलावलेल्या पाहुण्यांची गर्दी होती कारण सर्वांनाच वधू-वरांना बघायचे होते.उपस्थिती गर्दीतून दोघांनीही एकमेकांना पुष्पहार घातला आणि लग्नाचे इतर विधी पूर्ण केले.आणि जन्मोजन्मासाठी एकमेकांचे झाले.
 
नवगाचियातील अभिया बाजारचे  किशोरी मंडळ उर्फ ​गुजो मंडळाची मुलगी ममता कुमारी 24 वर्षांची आहे. आणि मसारू येथील बिंदेश्वरी मंडळाचा मुलगा मुन्ना भारती वय 26 वर्षांचा आहे.वधू आणि वर दोघेही भागलपूर जिल्ह्यातील आहेत.या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.