1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (11:04 IST)

काशी महाकाल एक्स्प्रेसमध्ये में महादेवासाठी रिर्झव्ह सीटमुळे वाद

Kashi Mahakal Express
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वाराणसीहून 'काशी-महाकाल एक्स्प्रेस' रवाना केली. यात एक सीट महादेवासाठी देखील राखीव आहे.
देवासाठी सीट रिर्झव्ह ठेवल्यामुळे AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी प्रश्न मांडले आहेत. ओवेसी यांनी ट्‍विटरवर संविधान प्रस्तावनासह पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत महाकालच्या सीटच्या बातमीला रीट्‍वीट केले आहे.
 
ट्रेन 2 राज्यांच्या 3 ज्योतिर्लिंगांचा प्रवास करणार. ही ट्रेन इंदौरच्या जवळ ओंकारेश्वर, उज्जैन येथील महाकालेश्वर आणि वाराणसी येथील काशी विश्वनाथालाा जोडत आहे. कोच बी-5 च्या सीट नंबर 64 मध्ये महादेवाचं लहानसं मंदिर तयार करण्यात आलं आहे.
आयआरसीटीसी संचलित या ट्रेनमध्ये शाकाहारी भोजन मिळेल, सोबतच यात प्रवास करणार्‍यांना भक्ती संगीत ऐकायला मिळेल. ट्रेनमध्ये 2 खाजगी गार्ड असतील. ट्रेन आठवड्यातून तीनदा वाराणसी- इंदौर प्रवास करेल.