शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 26 मार्च 2018 (11:28 IST)

भारताबाहेर सर्वाधिक लोकप्रिय

तुम्हाला असे वाटत असेल की, दोन वर्षांपासून प्रियांका चोप्रा अमेरिकेत राहत टीव्ही शो आणि हॉलिवूडध्ये काम  करत असल्याने भारताबाहेर सर्वाधिक लोकप्रिय आहे. किंवा दीपिकाने विन डिजलसारख्या मोठ्या अभिनेत्यासोबत हॉलिवूड चित्रपटात काम केल्याने ती लोकप्रिय असेल, तर ते चुकीचे आहे. आज भारताबाहेर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री नाव असेल तर ती अभिनेत्री आहे कटरिना कैफ. भारताबाहेर ज्या बॉलिवूड अभिनेत्री अधिक लोकप्रिय आहेत त्यात कतरिना कैफचा पहिला नंबर लागला आहे. व्हिडिओ ऑन डिमांड स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म स्पूलने केलेल्या सर्वेक्षणात हा निकाल आला आहे. यानुसार कतरिनाने अनुष्का शर्मा, आलिया भट, करिनाकपूर आणि काजोल यांना मागे टाकले आहे. ही कंपनी भारतीय आणि परदेशात राहणारे भारतीय काय पाहतात यासंबंधी काम करते. या कंपनीच्या सर्वेक्षणात पंजाबी अभिनेता दिलजित दोसंद भारताबाहेर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता आहे तर पंजाबी अभिनेत्री निरू बाजवर दोन नंबर, जिमी शेरगिल तीन नंबरवर आहेत. पंजाबी चित्रपट ऑस्ट्रेलियात सर्वाधिक लोकप्रिय असून त्यापाठोपाठ अमेरिका, न्यूझीलंड, ब्रिटन,पाकिस्तान, कॅनडा याचा नंबर आहे. तमिळी चित्रपट अमेरिका, सिंगापोर, मलेशिया, युएई आणि ब्रिटनमध्ये लोकप्रिय आहेत.