शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2017
Written By

स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपा आघाडीतून बाहेर

शेतकरी प्रश्नावर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेने भाजपा आघाडीला आपला पाठींबा दिला होता. तर शेतकरी संप आणि शेतकरी प्रश्वाव्र सतत सत्तधारी भाजपला विचारणा करत होते. याच काळात राजू शेट्टी यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळीक वाढत होत. शेतकरी संप झाला मात्र सरकारने हवी तशी कर्जमाफी शेतकरी वर्गाला दिली नाही म्हणून शेट्टी नाराज होते. तर खोत मात्र सरकार योग्य निर्णय घेतय असे बोलत होते. सर्वजनिक ठिकाणी आता शेट्टी आणि खोत एकत्र दिसणे बंद झाले आणि त्यांनी एकमेकांनवर टीका करयला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की शेतकरी संघटनेने खोत यांना बाहेर काढेल होते. खोत यांना मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कृषी राज्य मंत्री पद दिले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला केंद्रातील आणि राज्यातील सरकारचा पाठींबा काढून घेतला. तर राजू शेट्टी यांनी पुन्हा सरकारविरोधी भूमिका घेतली आणि आंदोलन सुरु केले आहे.यापुढे आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, आपण सर्वच पक्षांशी अंतर ठेवूनच राहू असेही शेट्टी यांनी जाहीर केले आहे.शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करणे आणि शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळणे या मुद्यांवर आता शेतकऱ्यांची चळवळ उभी करणार असल्याचेही शेट्टींनी जाहीर केले आहे.