शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2017
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (15:56 IST)

शेतकरी संप : पूर्ण राज्यात प्रथमच शेतकरी संपावर

आज पर्यंत अनेक कामगार आपण संपावर गेलेला पाहिले आहे. मात्र शेतकरी कधीही संपावर गेला नव्हता. मात्र तसे झाले या २०१७ वर्षात १ जूनपासूनच्या शेतकऱ्यांच्या संपाला सुरुवात झाली असून शेतकरी संपाची पहिली ठिणगी सातारा जिल्ह्यात पडली होती. यामध्ये दुधाचा ट्रक थांबून त्यातून दुध हे जमिनीवर टाकले होते. शेतकरी संघटनेने कोल्हापूरहून मुंबईला जाणारी दूध वाहतूक रोखून धरीत वारणा दूध डेअरीच्या दोन ट्रकची तोडफोड केली.कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव देणे शक्य होणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे मुंबईला जाणारे भाजीपाला व दुधाचे टँकर रोखण्यासाठी संपकरी  तयार झाले होते. शिवसेना, मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रहर संघटना, शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी शेतकरी संपात सहभाग नोंदवला होता.नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद येथून जाणारा भाजीपाला व दूध यांची वाहने मुंबई-नाशिक महामार्गावर घोटी, इगतपुरी येथे अडवायची, नगर, बीड, पुणे जिल्ह्यातील वाहने माळशेज घाटात, तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा येथून येणारी वाहने पुणे आणि लोणावळा शहराच्या अलीकडे अडवायची असे नियोजन करत संप सुरु केला होता.
 
शेतकरी संपामुळे ठप्प असललेल्या राज्य भरातल्या बाजार समित्या जवळपास ८ दिवसानी पूर्व पदावर येत होत्या.नवी मुंबईत महाराष्ट्रातूनच ५० टक्के गाड्या आल्यायत.  संगमनेर, कात्रज, सांगलीमधून भाजीपाला आणि फळं एपीएमसीमध्ये दाखल झालीयत. भाजीपाल्याची आवक वाढल्यानं भाज्यांचे भावही उतरायला लागले होते. संपाच्या काळात तुटवड्यामुळे भाज्यांचे वाढ कमालीचे वाढले होते.शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतमालाला हमीभाव द्या, दुधाला प्रती लिटर ५० रुपये भाव द्या व इतर मागण्या शेतकरी संघटनांनी लावून धरल्या होत्या. शेतकरी कर्ज माफी करत हा शेतकरी संप मागे घेण्यात आला आहे.