रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated :मुंबई , गुरूवार, 15 जुलै 2021 (20:07 IST)

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ‘नंबर 1’ मुख्यमंत्री, 13 राज्यांच्या सर्वेक्षणातून माहिती समोर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव पटकावलं असून त्यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव आहे. प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला असून ही बातमी समोर आली आहे. त्यात देशातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. द प्रिंटने त्याबाबत बातमी दिली आहे. अशावेळी महाविकास आघाडी सरकार आणि खासकरुन शिवसेनेसाठी एक महत्वाची बातमी समोर आलीय. 
   
सर्वेक्षणानुसार असं समोर आलं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray )यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सर्वेक्षणात जवळपास 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंना मतदान करणार असल्याचं काही मतदारांनी सांगितलं. या यादीत उद्धव ठाकरे अव्वल आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान  यांना 44 टक्के पसंती मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत. राज्यातील सर्वेक्षण झालेल्या 40 टक्के मतदारांनी त्यांच्या कामगिरीला मान्यता दिली.
 
प्रश्नमच्या सर्वेक्षणात 3 पर्याय
प्रश्नमने घेतलेल्या सर्वेक्षणात 13 राज्यात मिळून एकूण 17 हजार 500 जणांनी आपलं मत नोंदवलं. महत्वाची बाब म्हणजे हे सर्वेक्षण सर्वात मोठ्या सर्वेक्षणापैकी एक असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, या सर्वेक्षणात 3 पर्याय देण्यात आले होते.
1. मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब असून ते पुन्हा मु्ख्यमंत्री म्हणून नको
2. मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असली तरी पुन्हा त्यांना मत देणार नाही
3. मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असून, पुन्हा हेच मुख्यमंत्री हवे
उद्धव ठाकरेंना 49 टक्के मतं
या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असल्याचं मत नोंदवलं आहे. त्यांच्यापाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना 44 टक्के मतं मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आहेत. त्यांना 40 टक्के मतं मिळाली आहेत.