रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 11 डिसेंबर 2019 (09:52 IST)

'मिस युनिवर्स 2019' स्पर्धा , 'हे' व्हिडिओ सोशल मीडियावर झाले व्हायरल

'मिस युनिवर्स 2019' Miss Universe 2109  या  स्पर्धे दरम्यान  रॅम्प वॉक करताना अनेक स्पर्धक सौंदर्यावतींचा तोल गेला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  तोल गेल्यावर सर्व सौंदर्यवतींनी खूप चांगल्याप्रकारे सांभाळलं. तोल गेल्यानंतर या सौंदर्यवती हसल्या, टाळ्या वाजवत उठल्या आणि तेथून निघून गेल्या. दर्शकांनी देखील त्या सौंदर्य स्पर्धकांचा उत्साह वाढवला. या दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
 
यामध्ये मिस फ्रान्स माएवा कूचचा देखील सहभाग होतो. या वॉकच्या नंतर माएवाने रॅम्प वॉक करतानाचा तोल गेल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या दरम्यान माएवाचा आत्मविश्वास कुठेही कमी होताना दिसला नाही. माएवाने आपला व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे की, तिला या घटनेनंतर एक मोठी शिकवण मिळाली आहे. तसेच पडून उठणं हेच तर महिलांच्या जीवनातील महत्वाचा सार आहे. स्पर्धेत रॅम्प वॉक ओलं असल्यामुळे ती घटना घडली. कारण सगळ्या स्पर्धक एकाच ठिकाणी घसरल्या.