मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (00:20 IST)

तुमच्या 'चांदणी'ला भेट द्या खराखुरा चंद्र; लिलाव लवकरच

moon
अनेक प्रियकर हे आपल्या प्रेयसीला चंद्र तारे आणून देण्याबाबत बोलत असतात. अशांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. त्यात पूर्ण चंद्र तर नाही पण तुम्ही तुमच्या प्रेयसीला चंद्राचा तुकडा नक्कीच  देऊ शकाल. एका कंपनीने चंद्राचा तुकडा विकायला काढला आहे. 
 
हा तुकडा 12 पाऊंड (5.5 किलो) वजनाचा आहे. हा तुकडा 2017 मध्ये आफ्रिकेतील मौरितानियामध्ये वैज्ञानिकांनी शोधला होता. बॉस्टनच्या 'आरआर ऑक्शन कंपनी' चंद्राच्या या तुकड्याचा 5 लाख अमेरिकन डॉलर(साधारण 4 कोटी रुपये) किंवा त्यापेक्षा जास्त किमतीत लिलाव करत आहे. 18 ऑक्टोबरला यावर बोली लावली जाणार आहे. चंद्राचा तुकडा म्हणजेच लूनर मीटिऑरायटचा लिलाव करणार्‍या कंपनीचं म्हणनं आहे की, 'जगभरात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या उल्कापिंडांमध्ये हा सर्वात हत्त्वपूर्ण आहे. कारण हा चंद्राचा आतापर्यंतचा सर्वात मोठा तुकडा आहे. या दगडाला एनडब्लूए 11789 हे नाव देण्यात आलं आहे. तसेच याला बुआगाबा नावानेही ओळखले जाते. असे सांगितले जात आहे की, लूनर मीटिऑराइट हजारो वर्षांपूर्वी जमिनिवर पडला होता. हा तुकडा सहा खंडांनी मिळून तयार झाला आहे. यातील सर्वात मोठ्यातुकड्याचं वजन साधारण 6 पाऊंड इतकं आहे.