बुधवार, 22 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 12 जून 2021 (22:21 IST)

भुवन बाम वर शोककळा : कोरोनामुळे आई-वडील गमावले

Mourning on Bhuvan Bam: Corona loses parents
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्छाद मांडला असून अनेक घरे उध्वस्त केली आहे. मग तो सामान्य माणूस असो किंवा मोठा नेता किया सेलिब्रिटी असो कोरोनामुळे आपल्याला जवळच्या लोकांना गमावले आहे.अशा मध्ये एक धक्का दायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध यूट्यूबर भुवन बाम याच्या वर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आज त्याच्या आई-वडिलांचं निधन कोरोनामुळे झाल्याची बातमी काहीच वेळा पूर्वी त्याने स्वतः इंस्टाग्राम अकाउंट वर दिली.
 
नोव्हेंबर मध्ये भुवनला स्वतःला कोरोनाची लागण लागली असल्याची माहिती देखील त्याने शेयर केली त्यावेळी त्याचा वर घरातच उपचार सुरु होते. 
त्याचे आई वडील आजारी असून त्यांचावर उपचार सुरु होते. तो बऱ्याच काळापासून सोशल मीडिया पासून लांब असून आपल्या आई वडिलांच्या तब्बेतीची काळजी घेत होता.
 
आज त्याने त्याचे आई वडील गमावल्याने त्याच्या वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेयर करून त्यात लिहिले आहे की ''मी आज आपल्या दोन्ही लाईफ लाईन कोरोनामुळे गमावल्या आहेत.आता पूर्वीसारखं काहीच नसणार,या कोरोनाने माझे सारेकाही उध्वस्त केले आहे.
 
आई, बाबा आता माझ्यासोबत नाहीत. आता शून्यातून जगण्याला पुन्हा सुरुवात करावी लागेल. पण मन तयार होत नाही",त्याने या सह आपल्या आई वडिलांचा फोटो देखील शेयर केला आहे.मी त्यांना वाचविण्यात अपयशी ठरलो का? "मी एक उत्तम मुलगा ठरलो का?से प्रश्न आता आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. ते पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ शकतील का? मी आशा करतो की ते दिवस लवकरच येतील",असे ही त्याने म्हटलं आहे.