मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत, गौतम अदानी जागतिक यादीत 24 व्या क्रमांकावर
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी पुन्हा एकदा $83.4 अब्ज संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. जगातील श्रीमंतांच्या यादीत ते 9व्या क्रमांकावर आहे. 2023 च्या शेवटी श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी आता जागतिक यादीत 24 व्या स्थानावर घसरले आहेत.
फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत 211 अब्ज डॉलर्ससह फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. एलोन मस्क ($180 अब्ज) दुसऱ्या, जेफ बेझोस ($114 अब्ज) तिसऱ्या, लॅरी एलिसन ($107 अब्ज) चौथ्या आणि वॉरेन बफे ($106 अब्ज) पाचव्या स्थानावर आहेत.
अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांच्या संपत्तीत $57 अब्ज डॉलरची सर्वात मोठी घट झाली आहे, तर टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलोन मस्क यांच्या संपत्तीत एका वर्षात $39 अब्जची घट झाली आहे.
यावेळी विक्रमी 169 भारतीय अब्जाधीशांनी या यादीत स्थान मिळवले आहे. 2022 मध्ये ही संख्या 166 होती. 47.2 अब्ज डॉलर्ससह अदानी अजूनही अंबानीनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. भारतात शिव नाडर तिसऱ्या तर सायरस पूनावाला चौथ्या स्थानावर आहेत.
Edited by : Smita Joshi