Festival Posters

नागपूरचा पाऊस, पूर आला पाणी साचले आम्हाला काही म्हणायचे नाही - शिवसेना

Updated: शनिवार, 7 जुलै 2018 (16:24 IST)
 
एरवी पावसामुळे मुंबईच्या केवळ सखल भागात वीतभर पाणी साचले तरी ‘मुंबई बुडाली होSS’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत? त्यांना कोणीतरी कंठसुधारक वटी नेऊन द्यायला हवी. मुंबई महापालिका आणि शिवसेनेविरुद्ध कोणाला कितीही ठणाणा करू देत, पण काही तासांच्या पावसात नागपूर का बुडाले? कोणामुळे बुडाले? विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याइतकी नाचक्की का ओढवली, यावर मात्र आम्हाला काहीही म्हणायचे नाही!
 
महाराष्ट्राची उपराजधानी पाण्यात बुडाली आहे. शुक्रवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागपूर शहराची दाणादाणच नव्हे तर दैना उडवली आहे. नागपुरात सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याचे संपूर्ण सरकारच नागपुरात आले आहे. तथापि, विधान भवनातच पाणी शिरल्याने  विधिमंडळाचे अधिवेशनच दिवसभरासाठी स्थगित करण्याची भयंकर नामुष्की सरकारवर ओढवली. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी असलेले नागपूर काही तासांच्या पावसाने जलमय झाले. आमदार निवास, मंत्र्यांचे बंगले, वीज उपकेंद्रे सारे काही पाण्यात आहे. अधिवेशनासाठी आलेले अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचेही अतोनात हाल झाले. आपल्या डोळ्यासमोर शहरात पाणी भरते आहे, रस्त्यांचे रूपांतर नद्यांमध्ये होत आहे, हे पाहून मुख्यमंत्रीही नक्कीच व्यथित झाले असणार. ‘विकास पुरुष’ अशी ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे हे शहर. आपल्या लाडक्या शहराची आज जी अवस्था झाली ती बघून धडाकेबाज गडकरींनाही निःसंशय वेदना झाल्या असणारच. नागपूरच्या विमानतळापासून विधान भवनापर्यंत आणि बाजारपेठांपासून नागरिकांच्या घरादारांपर्यंत सारे काही जलमय झाले. घराबाहेर आणि रस्त्यावर उभी असलेली वाहने तर बुडालीच, पण दुकानांतही पाणी शिरले. सगळे रस्ते पाण्याखाली आणि विजेअभावी काळोख. यामुळे अवघे नागपूर शहर ठप्प झाले. मुंबई शहरातून जशी मिठी नदी धावते तशीच नागपुरातून नाग नदी वाहते. शुक्रवारच्या पावसात ही नदी दुथडी भरून वाहू लागली.नाग नदीतील अतिक्रमणांमुळे पुराच्या पाण्याने पात्र सोडले आणि हे पाणी शहरभर पसरले. शिवाय, शहरातील सगळ्या गटारी चोकअप! तुंबलेल्या गटारांनी नागपूरची परिस्थिती आणखी बिकट केली.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुसळधार पाऊस आणि वाढत्या पाणीपातळीमुळे पश्चिम रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या

शेवंतीची यशस्वी शेती: लागवड ते भरघोस उत्पादन

वैभव सूर्यवंशीच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या T20 मध्ये झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला

आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस विठ्ठलाच्या भक्तीत लीन झाले

विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरे बंधू २६ जुलै रोजी मुंबईत आंदोलन करणार

पुढील लेख
Show comments