मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (17:21 IST)

अभिनेता निर्मल सोनी नवे हाथीभाई

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध मालिकेत डॉक्टर हाथीची भूमिका साकारणाऱ्या कवी कुमार आझाद यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यामुळे निर्माते असितकुमार मोदी या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. अखेर डॉक्टर हाथी यांच्या भूमिकेसाठी अभिनेता निर्मल सोनी यांचं नाव निश्चित करण्यात आले आहे. निर्मल सोनी यांनी काही काळासाठी मालिकेत डॉ. हाथी यांची भूमिका साकारली होती. पुढील आठवड्यापासून निर्मल नव्या हाथीच्या रुपात मालिकेत दिसणार आहे. मालिकेतील ‘डॉ. हाथी’ या व्यक्तीरेखेला पूर्णविराम देता येणार नसल्यामुळेच गेल्या दीड महिन्यापासून नव्या अभिनेत्याच्या शोधात निर्माते होते.