बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (09:03 IST)

प्लॅटफॉर्म तिकिटावरही रेल्वेतून प्रवास शक्य, काही अटी लागू

रेल्वेच्या नव्या नियमांनुसार आपात्कालिन परिस्थितीत आता प्रवासी प्लॅटफॉर्म तिकिटावरही रेल्वेतून प्रवास करू शकणार आहेत. परंतु यासाठी रेल्वेने एक अट घातली आहे. यामध्ये रेल्वेच्या नियमानुसार हे परवानगी पत्र रेल्वेचे गार्ड, टिसी किंवा अन्य अधिकाऱ्यांकडून घेता येऊ शकते.
 
ट्रेनमध्ये चढल्यानंतर प्रवाशाला याबाबत टिसीला माहिती द्यावी लागेल. त्यानंतर सदर प्रवाशाच्या इच्छित स्थळाचे त्यांच्याकडून तिकिट बनवून घेता येईल. परंतु यासाठी केवळ 250 रूपये दंडाच्या स्वरूपात द्यावे लागणार आहेत. तसेच ज्या श्रेणीतून प्रवास करायचा असेल, त्याच श्रेणीचे शुल्क भरावे लागेल. प्रवाशी ज्या रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढला ते बोर्डिंग स्टेशन मानले जाणार आहे. परंतु याद्वारे प्रवसाची मुभा मिळणार असली तरी तिकिटाचे आरक्षण मात्र देण्यात येणार आहे.