सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , सोमवार, 1 जुलै 2019 (15:40 IST)

भारतात घटतेय पारंपरिक विवाहपद्धती

भारतात मुख्यत्वे शहरी भागात पारंपरिक विवाहांचे प्रमाण कमी होत आहेत. त्यांची जागा प्रेमाला संमती मिळून होणारे विवाह घेत आहे, असे संयु्रत राष्ट्रांच्या एका महिलाविषयक अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे वैवाहिक हिंसा कमी होत असून, अर्थ किंवा कुटुंब नियोजनासारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांत महिलांना महत्त्व देण्यात येत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.