शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

पिवळी साडी नेसलेली ऑफिसर पुन्हा चर्चेत, आता डांस व्हिडिओ व्हायरल

लोकसभा निवडणूक दरम्यान पिवळ्या रंगाची साडी नेसलेली एक पोलिंग अधिकारी खूप चर्चेत होती. या महिलेचं नाव रीना द्विवेदी असून त्या पीडब्लूडीमध्ये कार्यरत आहे. रीना मोहनलाल गंज येथील नगराममध्ये मतदान करवण्यासाठी गेली असताना त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. आता रीना पुन्हा एकदा चर्चेत आहे. कारण आहे त्यांचा डांस व्हिडिओ. रीना यांचा एक डांस व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर धमाल करत आहे.
 
रीना यांचा हा स्वत: तयार केलेला टिक-टॉक व्हिडिओ आहे. व्हिडिओ त्यांनी स्वत: सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केला आहे. यात रीना एक हरियाणवी गाण्यावर डांस करताना दिसत आहे. यात देखील रीना यांनी पिवळ्या रंगाची ड्रेस परिधान केलेली आहे. त्यांच्या डांस स्टेप्स बघून त्या नृत्याच्या शौकिन असल्याचे कळून येत आहे. रीना यांच्या फोटोप्रमाणेच चाहत्यांना त्याचा डांस व्हिडिओ देखील पसंत येत आहे.
 
आता त्या इतका प्रसिद्ध झाल्या आहेत की लोकं त्याच्यांसोबत सेल्फी घेऊ इच्छित असतात. अनेक मीडिया हाउसने त्यांचा इंटरव्यू देखील घेतला आहे. त्यांचे फोटो व्हायरल झाले होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की यावर त्यांचे कुटुंबातील लोकं खूश होते आणि त्यामुळे त्या खूप व्यस्त झाला असून मीडियात त्यांचे इंटरव्यू येणे, प्रसिद्धी मिळणे त्यांना पसंत आहे. त्या हे सर्व इंजाय करत असल्याचे म्हणाल्या.
 
रीना यांना चित्रपटात काम करण्यासाठी ऑफर देखील मिळाली आहे परंतू आपल्या मुलासाठी त्यांनी ऑफर नाकारल्या आहेत. त्यांना भोजपुरी चित्रपट काम करण्याची ऑफर होती पण त्यांना नकार दिला. कारण त्यांना मुलाकडे लक्ष देणे हे अधिक गरजेचं वाटतं.
 
पुढे ऑफर मिळाल्यावर विचार करेन असं म्हणणार्‍या रीना हल्ली तरी यावर ठाम आहे. उल्लेखनीय आहे की त्यांच्या पतीचं 2013 साली निधन झाले होते. वर्ष 2004 मध्ये त्यांचा विवाह पीडब्यूडी विभागात काम करणार्‍या सीनियर सहायक संजय द्विवेदी यांच्याशी झाले होते. परंतू पतीच्या निधनामुळे रीना यांना त्यांच्या जागी नोकरी मिळाली. त्यांचा मुलगा 13 वर्षाचा आहे.
 
फीट आणि फॅशनेबल राहणे हे रीना यांना लहानपणापासून आवडतं.