रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

विश्वास नांगरे पाटील यांचे सोशल मिडीयावर अधिकृत पेज, खाते नाही, १९ फेक खाती बंद

सोशल मिडीयाचा फटका दस्त्रूर कुद्द युवकांचे ताईत असलेले पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना देखील बसला आहे. फेसबूकवर त्यांच्या नावाने अन्र्क बनावट पेजेस तयार करून हजारो लाइकस् मिळविणाऱ्यांमुळे नांगरे-पाटील वैतागले आहेत. नांगरे पाटील आयुक्त म्हणून  नाशिकमध्ये आल्यापासून सायबर टीमला त्यांनी सूचना करून जवळपास १९ बनावट फेसबूक पेजेस डिलीट केले आहेत. तर नांगरे पाटील यांनी स्वतः सांगितले की  " फेसबुकवर माझ्या नावाचे अधिकृत असे अकाउंटदेखील नाही." त्यामुळे तुम्ही ज्या पेजला लाईक करत आहात ती सर्व पेज व खाती फेक आहेत. भविष्यात त्यावर कारवाई होईल याची दाट शक्यता आहे. 
 
सोशल म त्यांच्या नावाने फिरणा-या पोस्टस्, व्हिडिओ हे बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेसबूकवर केवळ विश्वास नांगरे पाटील असे नाव जरी सर्च केले तरी आठ ते दहा पेजेस आणि ग्रूप सहज सापडतात.  काही पेजेसला तर हजारोंच्या संख्येने लोक जोडलेले गेले आहेत.  त्यांच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवर किंवा अकाउंटवर भेट दिल्यास त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे छायाचित्रही सहज सापडते.  असे जरी  असले तरी स्वत: विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत ‘माझा फेसबूकशी कुठलाही संबंध नाही’ असे जाहीरपणे पत्रकारांसमोर सांगितले आहे. पाटील म्हणाले की "यू-ट्यूबवरदेखील  चाहत्यांनी माझ्या भाषणाचे व्हिडिओ क्लिप्स् अपलोड केल्यात,  मात्र त्यापैकी बहुतांश क्लिप्स मी स्वत: सायबर टिमला डिलिट करण्याच्या सूचना दिल्केया आहेत. यु-ट्यूबवरदेखील माझे वैयक्तिक असे कुठलेही चॅनलवगैरे नाही."