बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 20 जुलै 2019 (16:43 IST)

आता पत्नी आणि प्रेयसींच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती मागवली

विश्वचषकातील पराभवानंतर बीसीसीआयचं कामकाज पाहणाऱ्या, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासक समिती (COA) ने कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना खेळाडूंच्या पत्नी आणि प्रेयसींच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती मागवली आहे. सीओएच्या या निर्णयाने केवळ बीसीसीआयचे अधिकारीच नव्हे तर लोढा समितीही आश्चर्यचकीत आहे. याप्रकरणी आता लोकपाल डी के जैन यांनीच निर्णय घ्यावा, असं निवृत्त न्यायमूर्ती आर एम लोढा म्हणाले.
 
याआधी बीसीसीआयने क्रिकेटपटूंना विदेश दौऱ्यावर जाताना पत्नी आणि प्रेयसींना सोबत घेऊन जाण्यास आधी नकार दिला होता. मात्र नंतर काही अटींसह त्यांना परवानगी दिली होती. त्याचाच दाखला देत न्यायमूर्ती लोढांनी म्हणणं मांडलं.