शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (12:12 IST)

लक्षाधीश आहे पंतप्रधान मोदी, त्यांची मालमत्ता जाणून घ्या

देशाचे पंतप्रधान यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात. अशात आज आम्ही आपल्याला माहीत देत आहोत ती त्यांच्या संपत्तीबद्दल. संपत्तीच्या बाबतीत पंतप्रधान हे लक्षाधीश आहेत. एप्रिल 2019 पर्यंत त्यांची चल- अचल संपत्ती दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. 
 
एकूण मालमत्ता -
पंतप्रधानांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, पंतप्रधान मोदी यांची एकूण मालमत्ता दोन कोटी 51 लाख 36 हजार 119 रुपये आहे. जंगम मालमत्ते बद्दल बोलायचे झाले तर पंतप्रधानांकडे 38,750 रोख रक्कम आहे. तसेच भारतीय स्टेट बँक गांधीनगर शाखेत केवळ चार हजार 143 रुपये आहेत. 
 
20 हजाराचे आहे बॉण्ड - 
मोदीजींनी 20 हजार रुपये एल एन्ड टी इन्फ्रा बॉण्ड मध्ये गुंतवले आहेत. या शिवाय एनएससीमध्ये 7 लाख 61 हजार 466 रुपये आणि जीवन विमा पॉलिसीमध्ये 1 लाख 90 हजार 347 रुपये जमा केले आहेत. मोदी यांच्याकडे कोणतेही प्रकाराचे वाहन नाही.
 
45 ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या -
मोदींकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्यांचे वजन 45 ग्रॅम आहेत. त्यांची एकूण किंमत 1 लाख 13 हजार 800 रुपये आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी 85,145 रुपये अंदाजित आयकर साठी टीडीएस जमा केले आहे. या शिवाय त्यांनी 1,40,895 रुपये पीएमओ कडे जमा केले आहेत. 
 
एक कोटींची स्थावर मालमत्ता -
पंतप्रधान मोदी यांच्याकडे केवळ एक कोटीची स्थावर मालमत्ता आहे. मोदी यांनी 25 ऑक्टोबर 2002 रोजी 1,30,488 रुपयांची मालमत्ता खरेदी केली. त्यांनी यासाठी 2,47,208 रुपये खर्च केले.
 
सध्या बाजाराच्या भावानुसार या मालमत्तेची किंमत एक कोटी 10 लाख रुपये आहे. मोदी यांच्यावर कोणतेही प्रकाराचे कर्ज नाही. 2017- 18 या आर्थिक वर्षात मोदींचे वार्षिक उत्पन्न 19 लाख 92 हजार 520 रुपये होते. तसेच 2016 -17 मध्ये ते 14 लाख 59 हजार 750 रुपये असे. 
 
एम ए केले आहे- 
मोदी यांनी गुजरात विद्यापीठातून 1983 मध्ये एम ए केले आहेत. तसेच दिल्ली विद्यापीठातून 1978 मध्ये बी ए आणि 1967 मध्ये एसएससी बोर्ड गुजरात मधून 12वी चे शिक्षण घेतले आहेत. पीएमओ वेबसाइटनुसार, पंतप्रधान मोदींकडे 31 मार्च 2018 पर्यंत एकूण जंगम मालमत्ता एक कोटी 28 लाख 50 हजार 498 रुपये होती. 
 
तसेच स्थावर मालमत्ता देखील एक कोटी रुपयांच्या जवळ होती. स्थावर मालमत्तेत 48,994 रुपये रोख रक्कम होती. तसेच भारतीय स्टेट बँक गांधीनगर च्या शाखेत 11 लाख 29 हजार 690 रुपये होते. मोदी यांचा नावे एक एफ डी देखील आहे. जी 1 कोटी 7 लाख 96 हजार, 288 रुपयांची आहे.