रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मे 2020 (12:28 IST)

SBI च्या ग्राहकांना फटका, FD वरील व्याज दरात कपात

देशाच्या सर्वात मोठ्या बँक SBI ने किरकोळ (2 कोटी रुपयांपेक्षा कमी) एफडीच्या व्याजदरांमध्ये 0.40 टक्क्यापर्यंत कपात केली आहे. ही कपात सर्व मुदतीच्या एफडीसाठी केली गेली आहे.
 
बँकेने मोठ्या प्रमाणातच ठेवींवर(2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांवर) देखील व्याजदरांमध्ये 0.5 टक्क्यांनी कपात केली आहे. SBI ने मे मध्ये दुसऱ्यांदा मुदत ठेवींच्या व्याजदरात कपात केली आहे. या आधी बँकांनी 12 मे रोजी आपले ठेव दरांमध्ये कपात केली होती. नवे व्याजदर बुधवार पासून लागू करण्यात आले असून सर्व नवीन ठेवी आणि ठेवींच्या परिपक्व्तेनंतर नूतनीकरणावर लागू होणार.
 
एसबीआयच्या वेबसाइटनुसार 7 ते 45 दिवसांच्या परिपक्वतेच्या ठेवीवरील व्याजदर 2.90 टक्के आहे. जे आधी 3.30 टक्के होते. त्याच प्रमाणे 180 ते 210 दिवसांमधील ठेवीवरील व्याजदर 4.80 टक्क्यांवरून कपात करून 4.40 टक्क्याने करण्यात आला आहे.
 
एका वर्षा पेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीला आता 5.50 टक्क्यांऐवजी आता 5.10 टक्क्याने व्याजदर असेल. संकेतस्थळानुसार 5 वर्ष ते 10 वर्षाच्या ठेवींवर व्याजदर 5.70 टक्क्या ऐवजी 5.40 टक्के असणार.
 
ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सर्व कालावधीच्या किरकोळ मुदतीच्या ठेवीवरील व्याजदरात 0.4 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी नुकतेच सांगितले की सध्याच्या परिस्थितीला बघून व्याजदरांमध्ये कपात करण्यात येईल. ते म्हणाले की व्याजदरामधील ही कपात कर्जदार आणि ठेवीदार दोघांसाठीच असणार.