रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 2 जुलै 2018 (09:09 IST)

ज्याने मोबाईल बनवला त्याचा खून करायचा आहे - राज ठाकरे

उदघाटनाच्या कार्यक्रमाला गेल्यावर नव्या प्रकल्पाची नीट पाहणी येत नाहीत. लगेचच लोकांचे मोबाईल पुढे येतात, त्यामुळे मी राष्ट्रपतींना भेटून मला एक खून माफ करण्याची विनंती करणार आहे. मला मोबाईल निर्माण करणाऱ्याचाच खून करायचा आहे, असे राज ठाकरे यांनी मत मांडले आहे. मोबाईल वेड्यांवर राज यांनी चांगलीच टीका केली आहे, पुणे महानगरपालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या प्रभागातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान आणि मोरे बागेचे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. आमची नगरसेवक लोकप्रतिनिधी इतकी चांगली कामे करत असतांना नागरीका मात्र हवे तसे मत देत नाहीत त्यामुळे वाईट वाटते असेही राज यांनी सागितले आहे.