सारा तेंडुलकरने मराठीत सांगितली आजीची आठवण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सचिन तेंडुलकरची मुलगी.सारा तेंडुलकरचा मराठीत बोलतानाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या बातमीने मराठी भाषिकांचे आणि त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये, एका कार्यक्रमात स्टेजवरून अस्खलित मराठी बोलत सारा म्हणाली की तिची आजी तिला लहानपणी सोन्याच्या छोट्या भेटवस्तू कशा देत असे आणि ती मोठी झाल्यावर तिच्यासाठी काहीतरी खरेदी करण्याचे तिचे स्वप्न कसे होते आणि आता तिचे स्वतःचे पैसे कसे झाले आहेत.
तिची मराठी बोलण्याची शैली आणि तिने तिच्या आजीसोबत शेअर केलेल्या गोड आठवणींनी नेटिझन्स आणि चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडिया वर हा व्हिडीओ लक्ष वेधत आहे.
व्हायरल व्हिडीओ मध्ये ती म्हणाली, मी खूप लहान असताना माझी आजी मला सोन्याचं काही तरी देत असे. कधी कानातले तर कधी सोन्याची साखळी. माझे एक स्वप्न होते की, मी मोठी झाल्यावर आजीसाठी काहीतरी माझ्या पैशांनी घेईन. आता माझं हे स्वप्न पूर्ण झाले आहे.
साराने गेल्यावर्षी ऑगस्टच्या महिन्यात नवीन व्यवसाय सुरु केला आहे. तिने मुंबईच्या अंधेरीमध्ये तिची अकँडमी सुरु केली आहे. तिने पिलाटेस अकॅडमीची फ्रेंचाइजी घेतली असून ती लोकांना फिटनेसचे धडे देते. ती अनेकदा जिम मधले तिच्या वर्काउटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.
तिच्या या अकॅडमीचे उद्घाटन सचिन तेंडुलकरांनी गणेश पूजन करून नारळ फोडून केलं. या वेळी संपूर्ण तेंडुलकर कुटुंब आणि साराच्या काही मैत्रिणी उपस्थित होत्या.