Fact Check: सतत मास्क लावून फुफ्फुसात फंगल इन्फेक्शनचा धोका ? सत्य जाणून घेऊ या...
कोरोना विषाणूंचा धोका टाळण्यासाठी फेस मास्क घालणे फार गरजेचे आहे. पण सोशल मीडियावर वायरल झालेल्या एका दाव्यामुळे लोकांचा मनात भीती बसवून दिली आहे, लोकं घाबरत आहे. असा दावा केला जातो की सतत मास्कचा वापर केल्याने फुफ्फुसात फंगल इन्फेक्शन किंवा बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका आहे. चला जाणून घेऊ या वायरल झालेल्या दाव्याचे सत्य ...
वायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी आम्ही इंदूरच्या नाक, कान, गळा आणि कर्करोग तज्ज्ञ डॉ.सुबीर जैन यांच्याशी संवाद साधला. डॉ. जैन यांनी या वायरल झालेल्या दाव्याला नाकारले आहे. ते म्हणाले की सतत मास्क घालण्याने फुफ्फुसांमध्ये संसर्ग होण्याचा धोका नसतो, पण आपला मास्क पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडा असायला पाहिजे.
डॉ.जैन यांनी सांगितले की नाकातील ओलावा, तोंडाची लाळ आणि घामामुळे मास्क ओला होतो, त्यानंतर त्यावर बुरशी किंवा फंगलचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. अश्या परिस्थितीत जर आपण ओला मास्क घातल्यावर फंगस किंवा बुरशी आपल्या श्वासासह फुफ्फुसात गेले तर त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. म्हणून वापरले जाणारे मास्क दररोज चांगल्या प्रकारे साबण आणि गरम पाण्याने धुऊन घ्यावं आणि उन्हात वाळवावे. मास्क पूर्णपणे सुकल्यावरच त्याचा पुन्हा वापर केला पाहिजे.