गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2020 (14:09 IST)

अमृता फडणवीस त्या तीन शब्दांमुळे पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Amrita Fadnavis
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणार्‍या मिसेज फडणवीसांना यावर पोस्ट केलेल्या फोटोमुळेच ट्रोल होण्याची वेळ आली आहे. चर्चेसाठी एक फोटो हा कारणीभूत ठरला आहे.
 
नागपूर ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनाकालॉजिकल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेनं आयोजित केलेल्या एका वर्कशॉपमध्ये अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या हस्ते 'कम्युनिटी हेल्थ सर्व्हिसेस २०१९-२०' हा व्हिडिओ जारी करण्यात आला. वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. अमृता यांनी स्वत:च या संदर्भातील पोस्ट फेसबुक व ट्विटरवर शेअर केली आहे. कार्यशाळेत सहभागी झाल्या असताना टेबलवरील एका कागदावर लिहून ठेवलेल्या एका वाक्यामुळं त्या ट्रोल होत आहेत.
 
त्यांच्या बाजूलाच एक कोरा कागद दिसत असून त्यावर पुसटसं काहीतरी लिहिलेलं दिसत आहे. हा फोटो झूम करून पाहिल्यानंतर त्यावर 'फोटो लेते रहो' हे तीन शब्द दिसतात. त्यांचा हा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून त्यांची खिल्ली उडवली जात आहे.
 
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अमृता सातत्यानं लाईमलाइटमध्ये होत्या. अमृता फडणवीस यांना प्रसिद्धीची सवय लागल्याची टीका होऊ लागली होती.