गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जून 2020 (06:40 IST)

वास्तूप्रमाणे 7 पांढऱ्या घोड्यांचे इतकं महत्त्व का, जाणून घ्या

Vastu Shastra
वास्तु शास्त्रानुसार घोड्याचे चित्र जीवनात प्रगतीचे द्योतक आहेत. पण ह्याला कोणत्या दिशेने आणि कुठे लावावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया या संदर्भात खास 5 गोष्टी 
 
1 घराच्या बैठकीमध्ये समुद्राच्या काठीवर धावत असलेले 7 घोड्यांचे चित्र लावावे.
2 घोड्याचे चित्र लावण्यासाठी पूर्व दिशा शुभ मानली जाते, पण कार्यालयामध्ये दक्षिण दिशेस लावणे शुभ मानले जाते.
3 या तसबिरीला लावण्याने घरामध्ये सुख समृद्धीसह लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते.
4 हे नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा आणि विचारांचं निर्माण करतं.
5 वास्तु शास्त्रानुसार धावत असलेले घोडे गती, यश, आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे यामुळे जीवनात प्रगती होते.
 
टीप : सात अंक खूप शुभ असतो. ऋषी सात, इंद्रधनुष्याचे रंग सात, सप्तपदी देखील सात. असे अनेक गोष्टी 7 अंकाचे गुपित सांगतात. म्हणून 7 घोड्यांची तसबीरच लावावी. घोड्याची तसबीर बहुतेक वेळेस व्यावसायिक संस्थानामध्ये आणि कार्यालयामध्ये लावतात. म्हणून घरामध्ये घोड्याचे तसबीर लावण्याचा आधी वास्तु तज्ज्ञाचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल. ते आपणांस योग्य फोटो तसेच योग्य जागा याबद्दल सल्ला देऊ शकतात. कारण घराची बनावट बघून योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. घोड्यांची तसबीर लावायची नसल्यास आपण तरंगणाऱ्या माश्यांचे चित्र देखील लावू शकता.