अक्षय तृतीया आणि वास्तु : आर्थिक प्रगतीसाठी अमलात आणा हे 7 सोपे उपाय
1. वास्तु शास्त्रानुसार अक्षय तृतीयेला आपण घर किंवा दुकानात धन ठेवण्यासाठी उत्तर आणि पूर्व दिशा निवडा. या दिशेत धन ठेवल्याने आर्थिक प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात.
2. अक्षय तृतीयेला घर किंवा कार्यक्षेत्रात कोळीचे जाळं नसावे. वास्तुनुसार याने धन आगमन थांबतं म्हणून स्वच्छता करत राहावी.
3. अक्षय तृतीयेला घरात काही परिवर्तन करावे जसे या दिवशी उत्तर दिशेत आरसा लावावा. या दिशेत आरसा लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो ज्याने आय आणि धनवृद्धी होते.
4. आपल्या घरात नळ गळत असल्यास आधी दुरस्त करावा. नळ गळणे म्हणजे पैसा पाण्यासारखा वाहणे. घरातील कुठल्याही नळातून सतत पाणी वाहत असणे अशुभ मानले गेले आहे.
5. अक्षय तृतीयेला घरात फिश पॉट ठेवू शकतात. ज्यात आठ सोनेरी मासोळ्या आणि एक काळी मासोळी असणे योग्य ठरेल. अशाने भाग्य चमकेल. फिश पॉट घरातील ड्राइंग रूमच्या उजव्या बाजूला ठेवावे. याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतील.
6. अक्षय तृतीयेला आपण ज्या क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करत असाल त्यासंबंधी फोटो, ड्राइंग घरात लावावी. याने नोकरी-व्यवसायात प्रगती होते. आपण त्या क्षेत्रातील यशस्वी लोकांचे फोटो देखील लावू शकता.
7. या दिवशी मातीच्या मटक्यावर खरबूज ठेवून सवाष्णीला दान करावे आणि त्यांच्याकडून एक शिक्का घेऊन आपल्या तिजोरीत ठेवावे. आर्थिक प्रगतीसाठी हा उपाय अमलात आणावा.