सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 7 एप्रिल 2020 (11:25 IST)

वास्तुदोष दूर करेल गंगाजल...

असे म्हणतात की 'गंगे तव दर्शनात मुक्तिः' म्हणजे निव्वळ गंगेच्या दर्शनानेच प्राणिमात्रांचे सर्व त्रास आणि दुःख दूर होतात त्यांना सर्व त्रासातून मुक्ती मिळते. आणि तिच्या स्पर्शाने तर मोक्षाची प्राप्ती होते. पठण, यज्ञ ,मंत्र, होम आणि देवाच्या पूजनासारख्या शुभ कार्याने सुद्धा जी आत्मिक शांती मिळत नाही ती शांती गंगेच्या सेवनाने मिळते. 
 
गंगा ही शुद्ध स्वरूपिणी आहे. शारीरिक, दिव्य आणि भौतिक उष्णता, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष दडपण्यासाठी चार पुरुषांच्या शक्तीचे रूप आहेत. याचा पाण्यात सर्व पापांचा नाश तर होतोच पण त्या मागचे वैज्ञानिक कारण असे आहे की गंगेच्या पाण्यात औषधी गुणधर्म आढळते. ह्याचा पाण्याने अंघोळ केल्यास अनेक रोगांचा नायनाट होतो, तसेच वास्तुदोषही दूर होतात.
 
1 वास्तूदोषाचे निवारण - 
आपल्या घरात वास्तूदोष असल्यास आणि त्याचा आपणास त्रास होत असल्यास घरात नियमानने गंगाजलाने फवारणी करायला हवी. असे केल्यास वास्तू दोषांचा प्रभाव दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो. त्यासाठी नियमाने गंगेच्या पाण्याची फवारणी करावी.
 
2 गृह क्लेश दूर होतील - 
कुटुंबातील सदस्य अडचणीत असल्यास दररोज सकाळी घरात गंगेच्या पाण्याची फवारणी करायला हवी. असे केल्याने घराची नकारात्मकता नाहीशी होते आणि साकारात्मकतेचे वातावरण निर्मित होतं. 
 
3 दृष्ट लागल्यास - 
एखाद्या मुलाला किंवा कोणत्याही व्यक्तीला दृष्ट लागल्यास त्यावर गंगाजलाचे थेंबं टाकल्यास त्याचे दुष्परिणामास कमी करू शकतो.
 
4 भीतीदायक स्वप्ने बघितल्यास -
आपले मुलं रात्री घाबरून दचकून जागे झाल्यास किंवा वाईट स्वप्न बघत असल्यास झोपायचा आधी अंथरुणावर गंगेच्या पाण्याचे शिंपडावं करावे. वाईट स्वप्नं येणार नाही.
 
5 प्रगती करण्यासाठी - 
वास्तू दोषांमुळे घरात समस्या असल्यास पितळ्याच्या बाटलीत गंगाजल भरून घराच्या ईशान्य दिशेस ठेवावे. आपल्या सर्व समस्येचे नायनाट होईल. गंगाजलास नेहमी आपल्या पूजेच्या स्थळी आणि स्वयंपाकघराच्या ईशान्य दिशेस ठेवावे. आपल्याला नेहमीच प्रगती आणि यश मिळेल. ज्या घरात गंगाजल ठेवले जातं त्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रसरते आणि आंनद आणि भरभराटी येते.
 
6 निरोगी राहण्यासाठी -
गंगेच्या पाण्यात चमत्कारी शक्ती आहे. वर्षानुवर्षे बाटलीत ठेवल्या नंतरही पाणी खराब होत नाही. अशी आख्यायिका आहे की जो माणूस दररोज गंगेच्या पाण्याचे सेवन करतो तो निरोगी राहतो आणि दीर्घायुष्य जगतो. ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की गंगेच्या पाण्यामध्ये बुद्धिमत्ता वाढविण्याची आणि पचन तंत्र बलिष्ठ करण्याचे सामर्थ्य आहे.
 
7 ग्रहदोषांचा नायनाट करण्यासाठी - 
दर सोमवारी शिवपूजनाच्या दिवशी शिवलिंगावर गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्यास शंकर प्रसन्न होऊन सर्व दुर्गुणांचा नायनाट होईल तसेच दर शनिवारी एका तांब्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात जरा थेंबभर गंगाजल टाकून त्या पाण्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्याने शनीच्या दुष्प्रभावांपासून मुक्ती मिळते.