बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (16:16 IST)

घरात सुख नांदावं म्हणून काही वास्तू टिप्स

घर अशी जागा जिथे आपण मोकळ्यापणाने श्वास घेऊ शकतो जिथे निवांतपणे झोपू शकतो. संपूर्ण कुटुंब जेथे हसतं-खिदळतं. कधी कधी घराचा एक कोपरा पण निवांतपणा देतो तर कधी -कधी घरातील वातावरण तणावाचे आणि कलहाचे होऊन घराची शांतता खराब करतात. असे का होते कोणास ठाऊक ? चला तर मग ते जाणून घेऊ या की शुल्लक कारणामुळे आपल्या कुटुंबीयाशी का बरं भांडण करतो ...?
 
वास्तुशास्त्रानुसार घरातील बांधकामात काही चुका (दोष) असल्यास नकळतपणे त्याचा परिणाम आपल्यावर पडत असतो. या लेखात आपणास काही उपाय सांगत आहोत ज्यामुळे आपल्या घराचे वातावरण आल्हाददायक आणि आनंदी राहणार.
 
1 दारातील बिजागऱ्यांमध्ये तेल टाकावे. दारं उघडताना किंवा लावताना होणार्‍या आवाजामुळे दोष उत्पन्न होतात. 
2 घरातील सर्व विद्युत उपकरण जे जुनाट असतील जसे पंखे आणि कूलर, फ्रीज आवाज करत असतील त्यांना वेळीच दुरुस्त करावे.
3 घरात कमीत कमी वर्षातून एक-दोनवेळा तरी हवन (याग) किंवा यज्ञ करावे. 
4 घरातील इमारतीमध्ये पाण्याचा प्रवाह योग्य नसल्यास किंवा पाणी पुरवठा योग्य दिशेस नसल्याने तर योग्य दिशेस म्हणजे ईशान्य कडील दिशेने भूमिगत पाण्याची टाकी बांधून इमारतीत पाणीपुरवठा करावा. असे केल्यास वस्तू दोष नाहीसा होऊन पाण्याच्या पुरवठा योग्य दिशेस होईल.
5 घरातील देवघर ईशान्य दिशेस करावे.
6 घराचा पुढील भाग उंच असल्यास आणि मागील भागास तळ असल्यास मागील भागास डिश एंटीना लावावे असे केल्यास वस्तू दोष नाहीसा होतो.
7 घराच्या पूर्वी कडे आग्नेय आणि पश्चिमी दिशेस वायव्य असल्यास घराच्या स्वामीस भांडण आणि वाद-विवादामुळे मानसिक ताण होतो.
8 घरातील वायव्य कोण कमी असल्यास शत्रूमुळे मानसिक ताण घराच्या मालकास येतो.
9 घराची दक्षिणेकडे भागास कमी जागा आणि दक्षिणेस जास्त असल्यास कर्जाच्या तसेच आजाराच्या विळख्यात घराच्या स्वामी अडकतो आणि त्यास ताण तणाव होतो.
10 ज्या घराचे नैरृत्य आणि दक्षिणेस भाग खालीस असतो आणि उत्तर आणि ईशान्य दिशेस उंच असल्याने घराच्या स्वामीस मानसिक अशांतीचा त्रास होतो. आपण जर का दुमजली इमारत बांधण्यास इच्छुक आहात आणि तशी योजना आखत आहात तर इमारतीची उंची पूर्वेच्या दिशेने जास्त आणि उत्तरेच्या दिशेने कमी ठेवावे. तसेच इमारतीत ईशान्येच्या दिशेने जास्त प्रमाणात दारं आणि खिडक्या असाव्या.