शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जानेवारी 2020 (11:50 IST)

ज्योतिष शास्त्रानुसार पाण्याचे या ग्रहाशी आहे संबंध, वापरण्याचे नियम जाणून घ्या

जीवनाच्या निर्माणासाठी पाच तत्त्वांची गरज असते त्यापैकी एक महत्त्वाचं तत्त्व, जल तत्त्व आहे. जल मूर्त वस्तूंमध्ये सर्वाधिक मौल्यवान आणि चमत्कारी आहे. जल जीवन आहे ही गोष्ट तर अगदी बरोबर आहे परंतू त्यासोबतच व्यक्तीचं जीवन, त्याची भावना, क्षमता आणि आध्यात्मिकता देखील पाण्यामुळे निर्धारित होते.
 
पाण्याला चमत्कारी का म्हटले गेले आहे तर यामागील कारण आहे-
जल, सकारात्मक आणि नकारात्मक, दोन्ही प्रकाराच्या ऊर्जा शोषित करू शकतं. याच कारणामुळे पाण्याला मंत्राने अभिमंत्रित करण्याची क्रिया केली जाते. शरीरातील जल तत्त्वच आपल्याला शक्तिशाली आणि दिव्य बनवू शकतं. पाणी वापरूनच वास्तविक आणि काल्पनिक दोन्ही समस्या दूर केल्या जाऊ शकतात. 
जीवनात पाण्याचा योग्य आणि संतुलित वापर आपल्याला निरोगी आणि विषमुक्त ठेवू शकतं. हे भावना प्रवाहित होण्यापासून नियंत्रित करण्यास मदत करतं आणि आपल्याला आध्यात्मिक बनवतं.
 
पाण्याचा वापर करताना कोणते नियम आणि सावधगिरी बाळगायला हवी  हे आम्ही आपल्याला सांगत आहोत-
पाण्याचा अधिकाधिक वापर आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करेल.
दिवसा अधिक प्रमाणात तर रात्री कमी प्रमाणात पाण्याचे सेवन करावे.
उभे राहून एकाच वेळी जास्त प्रमाणात पाणी पिऊ नये.
सामान्य तापमानाचे पाणी औषधी प्रमाणे कार्य करतं.
पाण्याची रक्षा आणि संरक्षण केल्याने चंद्र आणि मन दोन्ही मजबूत होतात.
पाणी वाया घालवल्याने आर्थिक आणि मानसिक नुकसान होतं.
ज्या लोकांच्या घरात पाणी वाया जात असतं त्यांना मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरा जावं लागतं.
 
आता बघू या की पाणी आणि ज्योतिष यांच्यात काय संबंध आहे ते-
जल मुख्य रूपाने चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंधित आहे.
काही प्रमाणात याचा संबंध मंगळ ग्रहाशी देखील आहे.
पाण्याचा योग्य वापर चंद्र आणि शुक्र मजबूत करतं.
 
चंद्र मजबूत करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी कशा प्रकारे पाणी वापरावं हे नियम आम्ही आपल्याला सांगत आहोत-
घरात फुलांचे झाडं लावावे.
नियमित त्यांना पाणी घालावे.
पावसाळ्यात पाणी भरलेली एक काचेची बाटली आपल्या शयनकक्षात ठेवावी.
चांदीच्या ग्लासात पाणी पिण्याने चंद्र मजबूत होतं.
चंद्र मजबूत करण्यासाठी अंघोळ करताना सर्वात आधी नाभीत पाणी घालून मग अंघोळ करावी.
 
शुक्र मजबूत करण्यासाठी पाण्याचा वापर या प्रकारे करा-
शक्योतर दोन्ही वेळेस अंघोळ करावी.
नियमित रूपाने सुवासिक पाण्याने अंघोळ करावी.
काचेच्या ग्लासने पाणी प्यावे.
शुक्र खराब असल्या कोणाला पाण्याचे भांड भेट म्हणून देऊ नये.