सौर मंडळातील सूर्याच्या गतीत बदल झाल्याने यंदा संक्रात 15 जोनवारीस येत आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करून उत्तरायण सुरू होते.
उत्तरायणाचे सहा महिने हे शुभ असतात असे भगवद्-गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी देखील म्हटले आहे. या सणाच्या दिवशी दानधर्म केल्यास पुण्य लागते असेही म्हटले जाते. तर जाणून घ्या आपल्या राशीप्रमाणे कोणत्या प्रकारचं दान करणे आपल्यासाठी शुभ ठरेल ते:
मेष
या राशीच्या जातकांनी गूळ, चिकी, तिळाचे दान करावे.
वृषभ
या राशीच्या जातकांनी पांढरे कपडे, पांढरे तीळ दान करावे.
मिथुन
संक्रांतीच्या दिवशी या जातकांनी मूग डाळ, तांदूळ आणि ब्लँकेट दान करावे.
कर्क
या राशींच्या लोकांनी चांदी, तांदूळ आणि पांढरे वस्त्र दान करावे.
सिंह
या राशीच्या जातकांनी तांबा, सोनं दान करणे शुभ ठरेल.
कन्या
या राशीच्या जातकांनी तांदूळ, हिरवे मूग किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र दान करावे.
तूळ
या राशीच्या जातकांनी हिरे, साखर किंवा ब्लँकेट दान करावे.
वृश्चिक
या जातकांनी मूंगा, लाल कपडा, काळे तीळ दान करावे.
धनू
या राशीच्या जातकांनी वस्त्र, तांदूळ, तीळ आणि गूळ दान करावे.
मकर
या राशीच्या जातकांसाठी गूळ, तांदूळ आणि तीळ दान करणे शुभ ठरेल.
कुंभ
या राशीच्या जातकांनी काळा कपडा, काळी उडीद, खिचडी आणि तीळ दान करावे.
मीन
या जातकांनी रेशीम कापड, चण्याची डाळ, तांदूळ आणि तीळ दान करावे.