1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जानेवारी 2020 (15:40 IST)

भोगीची भाजी तयार करण्याची सोपी कृती

makar sankranti 2020
साहित्य:
1 चिरलेला बटाटा, 1 मध्यम आकाराचं चिरलेलं वांगे, 1 चिरलेलं गाजर, अर्धी वाटी ताजे मटार, अर्धी वाटी हिरवे हरभरे, 1 मोठा चमचा भिजवलेले शेंगदाणे, 1 मोठी शेवगाची शेंग (लांब काप केलेली). 2 चमचे तिळकूट, 2 चमचे चिेंचेला कोळ, 1 मोठा गूळ, - मोठा चमचा ओलं खोबरं, चवीपुरते मीठ, फोडणीचं साहित्य 
 
कृती:
पातेल्यात तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. यात शेंगदाणे, ताजे मटार, हिरवे हरभरे, बटाटा, शेवग्याच्या शेंगा आणि मीठ घालून वाफा काढाव्या. नंतर वांगं आणि गाजर घालून जरा पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवून शिजू द्यावे. भाज्या शिजत आल्यावर चिंच कोळ आणि काळा मसाला घालावा. शिजल्यावर गूळ, तिळाचा कूट, खोबरं घालावे. भाकरीबरोबर गरमागरम भाजी सर्व्ह करावी.